नाशिक

‘नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा’

नाशिक (अभयकुमार देशमुख) :
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील २०/२५ वर्षांपासून प्रचंड भ्रष्टाचार, घोटाळे,अनियमितता,अफरातफर झाली असुन यात एम एस सी बँकेच्या  चुकांमुळे किंवा संगनमताने या बाजार समितीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर बाजार समिती त्वरित बरखास्त करावी अशी मागणी भाजप नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस व कादवा सहकारी साखर कारखानाचे संचालक सुनिल केदार यांनी केली आहे.

नाशिक बाजार समितीमध्ये शासकीय लेखा परिक्षण अहवालात करोडोंचा घोटाळा झाल्याचे लेखी नमुद केलेले आहे. याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत.तथापि आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व संचालक मंडळ कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असुन जे जे कर्मचारी विद्यमान संचालक मंडळास भ्रष्टाचार करण्यास साथ देत नाही व विरोध करतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवीतात त्यांना येनकेन प्रकारे त्रास दिला जातो.कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मांडु दिल्या जात नाही. आंदोलन करू नये म्हणुन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो. त्यांच्या रजा कोणतेही सबळ कारण नसतांना बिनपगारी केल्या जातात. त्यांचे नोकरीचे रेकॉर्ड खराब व्हावे म्हणून खोटेनाटे मेमो व नोटीसा दिल्या जातात.अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेतले जात नाही. सातवा वेतन आयोग अद्याप लागु केला नाही. शेतकऱ्यांना कोणत्याही मुलभूत व त्यांच्या हक्काच्या सुविधा दिल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या शेत मालाच्या भावाची संगनमताने लुट केली जाते. काही गुंड टोळ्या या ठिकाणी पडद्याआड कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत दादागिरी केली जात असल्याचा आरोप यावेळी केदार यांनी केला.
आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आकसाने,सुडबुध्दीने,हेतुपुरस्कर बदल्या केल्या जातात. या सर्व गैरकारभारामुळे या बाजार समितीचा उकिरडा झाला आहे. या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष निलेश दिंडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.२४ जुलै पासुन ईदगाह मैदान नाशिक येथे सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आमचा पाठिंबा असुन त्यांच्या मागण्या रास्त आहेत. शासनाने त्यांच्या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी. त्यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्या, या बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारात दोषींवर कडक कारवाई करावी व सदर बाजार समिती त्वरित बरखास्त करून या बाजार समितीवर योग्य व्यक्तींची नेमणुक करावी असे भाजप नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस व कादवा सहकारी साखर कारखाना संचालक सुनील केदार यांनी पत्रकान्वये म्हटले आहे.नाशिक भाजप १७ वर्षांपासून याविरोधात लढा देत असुन हा निर्णायक लढा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: