नाशिक

नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट-नो पेट्रोलची सक्ती करू नये’

नाशिक (अभयकुमार देशमुख)  :
नाशिक शहरात ज्या दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याचे फर्मान नाशिक पोलीस आयुक्त यांनी काढले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होणार आहे.हा फतवा योग्य नाही.कारण नाशिक शहरातल्या शहरात अनेक दुचाकीस्वारांची थोड्या थोड्या अंतरावर कामे असतात.त्यामुळे वारंवार हेल्मेट घालणे व पावलोपावली काढणे त्याला शक्य नसते.त्यामुळे ही सक्ती मागे घ्यावी अशी मागणी भाजप नाशिक महानगर सरचिटणीस सुनील केदार यांनी पत्रकान्वये केली आहे.
पोलिसांनी हेल्मेट वापराचे प्रबोधन करावे पण सक्ती करू नये.नाशिक शहरात हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अत्यल्प आहे.अनेक दुचाकीस्वार स्वसंरक्षणासाठी स्वतःहुन हेल्मेट नियमित वापरतात परंतु ज्यावेळी शहरात अगदी पावलोपावली जवळच्या अंतरावर प्रवास असतो त्यावेळी हेल्मेट घालणे व पुन्हा पुन्हा काढणे जिकिरीचे होऊन जाते.अशा प्रसंगी तो दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाही.त्यामुळे पोलिसांनी प्रॅक्टिकल पहावे.हुकुमशाही प्रवृत्ती न दाखविता हेल्मेट वापराचे प्रबोधन करावे पण सक्ती व दंड दोन्ही करू नये.

सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत.अनेकांचे उत्पनाचे मार्ग खुंटले आहेत व कमी झालेले आहेत.अशा प्रसंगी सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत आली आहे.त्यातच भरीस भर असे किचकट व जाचक नियम,आदेश निघत असतील तर ते योग्य होणार नाही. हे म्हणजे घरचे झाले थोडं व व्याह्याने मारले घोडं अशी गत सर्वसामान्यांची झाली आहे.त्यामळे पोलीस आयुक्त यांनी नो हेल्मेट-नो पेट्रोल हा आदेश मागे घ्यावा व त्याऐवजी हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रबोधन करावे अशी मागणी सुनील केदार यांनी पत्रकान्वये केली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: