देश-विदेश

‘त्या’ मृतदेहांसाठी नौदलाची तारेवरची कसरत 

मुंबई : 
चक्रीवादळात पी 305 बार्ज व टगबोट वरप्रदा जेथे बुडाली तेथे समुद्राची खोली फार नसली तरी साधारण तीस मीटर (सुमारे दहा मजली उंच इमारतीएवढी) आहे. तेथे समुद्राचे पाणी गढूळ असल्याने दृष्यमानता जवळपास शून्य आहे. अशा स्थितीत नौदलाचे (INS) कसलेले पाणबुडे दोरी धरून खालपर्यंत बोटींमध्ये जाऊन मृतदेहांचा शोध घेत आहेत. त्यांची शब्दशः तारेवरची कसरत दाखवणारा हा समुद्राखाली टिपलेला व्हिडियो नौदलाच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीस दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: