महाराष्ट्र

‘लक्षद्वीप’साठी ‘राष्ट्रवादी’ची ५० लाखांची मदत…

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
लक्षद्वीपच्या प्रशासकांनी आणलेल्या अतार्किक निर्बंधांमुळे तिथे समस्या निर्माण झाल्या असून या पार्श्वभूमीवर लक्षद्वीपचे खासदार पी.पी. मोहम्मद फैज़ल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन लक्षद्वीपमध्ये उद्भवलेल्या प्रश्नांबाबत विस्तृतपणे चर्चा केली.

या भेटीदरम्यान तौक्ते चक्रीवादळामुळे लक्षद्वीपमध्ये स्थानिक मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या बोटी उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का अशी विचारणा पी. पी. मोहम्मद फैजल यांनी शरद पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यावर तात्काळ शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे ५० लाख रुपयांची मदत लक्षद्वीपच्या नागरिकांना देण्याचे निर्देश दिले असल्याचे पी. पी. मोहम्मद फैजल यांनी सांगितले. दरम्यान लक्षद्वीप जनतेच्यावतीने खासदार मोहम्मद फैजल यांनी खासदार शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: