पुणे 

‘…तर आपला पराभव कोणीही करू शकत नाही’

लातूर (अभयकुमार देशमुख) :
विकासाचा वेग वाढवायचा असेल तर आपल्याला माणसं जोडावी लागतील म्हणून बुथ सक्षम करा. वैचारिक सैन्य सोबत असेल तर आपला पराभव कोणीही करू शकत नाही असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा तिसरा दिवस असून पहिली आढावा बैठक उदगीर येथे पार पडली.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांना मंत्रीपद देऊन पवारसाहेबांनी उदगीर, जळकोट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. या मतदारसंघाचा विकास खुंटलेला होता त्याला गती देण्याचे काम आता महाविकास आघाडी करत आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

येत्या काळात बुथ कमिट्या आपल्याला सक्षम करायच्या आहेत. उदगीर आणि अहमदपूर या मतदारसंघात बुथ कमिट्या मजबूत होत्या म्हणून आपल्याला हा विजय खेचून आणता आला असेही जयंत पाटील म्हणाले.

पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने आपण चालतो आहे. म्हणून तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला हवे. प्रत्येक आजाराचे आपणच औषध नाही पण प्रयत्न करायला हवा म्हणून प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर यांनी आपले विचार मांडले. 

या आढावा बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, महम्मद खान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल खय्युम खान, नगराध्यक्ष असफर शेख, प्रदेश सरचिटणीस आशा भिसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, निरीक्षक वसंत सुगावे, संजय शेट्टी, मराठवाडा निरीक्षक प्रज्ञाताई खोसरे, जिल्हाध्यक्ष मिनाक्षी शिंगडे, युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील, युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका लद्दे हे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: