महाराष्ट्र

‘…मग महाराष्ट्राला सापत्न वागणूक का?’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
दोन दिवसा आधी आलेल्या तौकते चक्रीवादळाने केरळ महाराष्ट्र आणि गुजरात या तीनही राज्यात थैमान घातले.  पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याला सढळ हस्ते 1000 कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी ही त्यांना दिसली नाही. महाराष्ट्राला त्यांनी अशी सापत्न वागणूक का दिली असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी विचारला आहे.
तौकतेमुळे महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे व नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. पण हे नुकसान मोदींना दिसले नाही. कोकणातल्या माणसावर नरेंद्र मोदी सरकारने अन्याय केला आहे. देशाचे पंतप्रधान राज्याराज्यांमध्ये भेदभाव करतील ही अपेक्षा नव्हती. वास्तविक सगळ्यांनाच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देतील ही अपेक्षा होती परंतु जिथे सरकार तिथेच मदत कदाचित अशी भाजप सरकारची भूमिका असावी. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी असल्याचेही तपासे यांनी यावेळी नमूद केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: