क्रीडा-अर्थमतदेश-विदेश

२३ रोजी ‘एनइएफटी’ असणार बंद

मुंबई :
डिजिटल व्यवहारासंदर्भात आरबीआयने एक सूचना जारी केली आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काही अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही. जवळपास १४ तास ही सेवा बंद असणार आहे. अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. १८ एप्रिल २०२१ रोजीही असंच अपग्रेडशन करण्यात आलं होतं.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: