गोवा 

”​​इव्हरमेक्टीन​’ची पुढील खरेदी केलीच नाही’

पणजी :
‘​इव्हरमेक्टीन’​च्या गोळ्यांवरून राज्यात काँग्रेस-भाजप मध्ये गेले सुमारे महिनाभर बरेच राजकारण आणि आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयवार पडदा टाकण्याचा प्रयत्न करत, सदर गोळ्या आयसीएमआरने निर्देश दिल्यामुळे  या गोळ्यांची खरेदी सरकारकडून करण्यात आलेली नाही असे पत्रकारांना मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.
‘आयसीएमआर’च्या निर्देशांनंतर राज्य सरकारने तत्काळ ​​इव्हरमेक्टीन गोळ्यांची खरेदी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. पण काहीजण यावरून सरकारवर आरोपबाजी करून जनतेत गैरसमज पसरवत आहेत, असा निशाणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साधला. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लवकरच ‘टीका उत्सव ३’ सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घरी विलगीकरणात असलेल्यांना मोफत किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावेळी किटमधील औषधांत इव्हरमेक्टीनचा समावेश असल्याने तेव्हा सरकारने इव्हरमेक्टीन गोळ्यांची खरेदी केली होती. ‘आयसीएमआर’ने निर्देश जारी करताच आणखी इव्हरमेक्टीन गोळ्या खरेदी करण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द केला. काहीजणांना यावरून राजकारण करायचे असल्यामुळे ते अभ्यास न करताच सरकारवर आरोपबाजी करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

​दरम्यान, ​राज्यात मुबलक प्रमाणात लसींचा साठा व्हावा यासाठी राज्य सरकार आणि खाण कंपन्यांनी ५०-५० टक्के भार उचलून लसी खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण आता केंद्र सरकारकडून राज्याला आवश्यक तितक्या लसी मिळणार असल्याने हा प्रस्ताव रद्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

​तर, ​जुलैमध्ये होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सरकार संपूर्ण अर्थसंकल्प मंजूर करून घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी वित्त खात्यावर केलेल्या गंभीर आरोपांबाबत छेडले असता काब्राल यांनी अजून आपल्याशी याबाबत चर्चा केलेली नाही. वित्त नियमांमुळे काहीवेळा समस्या उद्भवू शकतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: