देश-विदेश

‘…म्हणून होत आहेत कोरोनाचे नवे व्हेरिएन्ट’

नवी दिल्ली :
एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लसीकरणावर भर देत जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य देत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे करोनाचे नवीन म्युटेटेड म्हणजेच जणुकीय बदल असणारे विषाणू अधिक घातक ठरत आहेत. अशातच फ्रान्समधील एका नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यपकाने एक धक्कादायक दावा केलाय. प्राध्यापक ल्यूक मॉन्टैग्नियर यांनी एका मुलाखतीमध्ये करोना प्रतिबंधक लसींमुळेच करोना विषाणू अधिक धोकादायक आणि रचनात्मक दृष्ट्या शक्तीशाली होत असल्याचं म्हटलं आहे. करोना लसीकरणामुळेच अधिक घातक ठरणारे करोनाने नवीन नवीन प्रकार समोर येत असल्याचा दावाही मॉन्टैग्नियर यांनी केलाय.

मॉन्टैग्नियर यांनी मे महिन्याच्या सुरुवातील एका फ्रेंच पत्रकाराला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी साथरोग तज्ज्ञांना लसींसंदर्भातील दाव्यांबद्दल पूर्ण कल्पना असली तरी ते शांत असल्याचा दावा केलाय. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना मॉन्टैग्नियर यांनी, “लसींमुळे विषाणूंचा प्रसार थांबत नाही तर त्याचा उलट परिणाम होऊन विषाणू अधिक शक्तीशाली होतात. लसीकरणामुळेच करोनाचे नवीन विषाणू हे आधीच्या विषाणूंच्या तुलनेत अधिक नुकसान करत असल्याचं दिसत आहे,” असा दावा केलाय.

ल्यूक मॉन्टैग्नियर
ल्यूक मॉन्टैग्नियर

मॉन्टैग्नियर हे फ्रान्समधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट म्हणजेच साथरोगतज्ज्ञ आहेत. त्यांना २००८ साली नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांनी व्यक्त केलेली शंका आणि दावा सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी पियरे बर्नेरियास या वरीष्ठ पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये करोनासंदर्भात अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं होता. या मुलाखतीमधील क्लिप सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अमेरिकेतील रेअर फाऊंडेशनने फ्रेंच भाषेतील या मुलाखतीचं भाषांतर केलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: