सातारा 

‘सत्ता कोणाचीही असो बोडारवाडी धरण मार्गी लावणारच’

मेढा (प्रतिनिधी) :

राज्यात सत्ता कोणाचीही असू द्या जावलीच्या अस्मितेकरीता एका दशकांहून अधिक रेंगाळलेल्या बोडारवाडी धरणाचा प्रश्न आमदार म्हणुन मार्गी लावणार आहे. बोडारवाडी धरणाबातीत ५४ गावातील शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका असे अवाहन सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिेंद्रसिंहराजे यांनी मेढा येथे आयोजीत पत्रकार परीषदेत केले.

यावेळी ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार याच्या माध्यमातुन बोडारवाडी धरणाकरीता पाठपुरावा ठेवला आहे. धरणाच्या भितीरेषाबाबतीत बोडारवाडी गावातील नागरीकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच इमारत रेषा निश्तितेचा प्रश्न मार्गी लागला आहे . बोडारवाडी घरण हे ५४ गावांच्या लोकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे .मात्र या बोडारवाडी धरणाबाबतीत बंधारा होणार म्हणुन दिशाभूल करण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न सुरु असुन. अशी दिशाभूल करणारी माहीती देवुन गैरसमज निर्माण करु नका असे अवाहन त्यानी यावेळी केले.

जावली तालुक्यांचा लोकप्रतिनीधी म्हणून मी २००९ पासुन बोडारवाडी धरणाबाबतीत मी प्रयत्नशील आहे . महाराष्ट राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार याच्याकडुन बोडारवाडी धरणाची तत्वता मान्यता मिळवली आहे. शेतकर्याच्या व्यथा जाणत धरणाचा जास्तीत जास्त फायदा शेतकर्याचा असायला हवा हाच माझा उद्देश माझा राहीला आहे.

जावली बोडारवाडी धरणचा तांत्रिकदृष्या अधिकार्यानकडुन अहवाल सादर करण्याचा मुद्दा मार्गी लावला जात आहे . लवकरच सर्व सर्व्हे पुर्ण होवुन धरणाचा अहवाल मार्गी लावला जाईल.

जावलीत बोडारवाडी धरणाकरीता आपण कोणतीही दुसरी समिती तयार केली नसल्याची जाहीर माहीत पत्रकार परीषदेत शिवेंद्रराजे यांनी दिली. धरण कृती समितीचे अध्यक्ष मोहन कासर्डे आजही आपल्या बरोबर आहेत. ज्यांना बोडारवाडी धरणाच्या पडद्यामागुन राजकारण करायचे आहे त्यानी राजकारण थांबवावे. बोडरवाडी धरणाच्या उभारणीकरता भुतकाळात बोलावलेल्या मीटिंगकरीता मला लोकप्रतिनीधी म्हणुन सदैव डावलले गेले असल्याची खंत यावेळी त्यानी व्यक्त केली.

मात्र जावलीच्या बोडारवाडी धरण होणे हा केद्रबिदुं मानुन मी सदैव प्रयत्नशील आहे . बोडारवाडी धरणांचे कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी याच्याशी आजही संबंध चांगले असुन बोडारवाडी धरणाला मार्गी लावण्याकरीता कोणताही दुजाभाव आपल्याकडुन होणार नसल्याची माहीती त्यानी दिली.

यावेळी समाजसेवक ज्ञानदेव राजणे , मेंढ्यांचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ , उपनगराध्यक्ष कल्पना जवळ , माजी सरपंच बडोपंत ओबळे , हरीभाऊ सपकाळ , अध्यक्ष रामभाऊ शेलार ,मोहन कासुर्डे , चेअरमन बेलोशे याच्यासह विविध गावाचे सरपंच यावेळी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: