Homeसातारा 

मिरगावातील जखमी आरोग्य केंद्रात दाखल

कराड (अभयकुमार देशमुख) :
​पाटण तालुक्यातील मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनामुळे जखमी झालेल्या पुरुष, महिला, युवक, युवती यांना हेळवाक ता.पाटण येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व तेथील जखमी रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

तसेच हुंबरळी येथे झालेल्या भूस्खलनमुळे जखमी झालेल्या युवकाला हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले आहे।। हुंबरळी येथील घटनेत एका वृद्ध महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

सदर भेटीवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद खराडे, पाटण, हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर उपस्थित होते​.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: