देश-विदेश

”या’ पद्धतीने वाढवता येईल लस उत्पादन’

नवी दिल्ली :
देशातील इतर लस बनवणाऱ्या कंपन्यांनाही करोना लस बनवण्याचा परवाना दिला जावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. देशात लसीची मागणी वाढत असेल तर लस बनवणाऱ्या एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना परवाना दिला जायला हवा. प्रत्येक राज्यात दोन – तीन लॅब आहे. त्यांनी लसनिर्मिती सेवा म्हणून नाही तर १० टक्के रॉयल्टीसोबत करावी. हे केवळ १५-२० दिवसांत करणं शक्य आहे यामुळे देशात लसनिर्मिती मोठ्याप्रमाणात होऊ शकेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे.
या कंपन्यांनी अगोदर भारतासाठी लस बनवानी त्यानंतर उत्पादन अधिक असेल तर आपण ती निर्यातही करू शकतो, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलंय. औषधाचं पेटेन्ट धारकांना आणखीन काही औषध कंपन्यांद्वारे १० टक्के रॉयल्टी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

nitin gadkariयासोबतच, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अंत्यंस्कारासाठीही सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. स्मशानभूमीत डिझेल, इथेनॉल, बायोगॅस आणि वीज यांचा वापर करत खर्च कमी केला जाऊ शकतो. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील अनेक मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात आढळल्यानंतर अंत्यसंस्कारावरव प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्यावर नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलंय. सोबतच ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: