क्रीडा-अर्थमत

काय आहे ‘नोकिया सी20 प्लस’ची खासियत?

मुंबई :
‘एचएमडी ग्लोबल’ या नोकिया फोनच्या उत्पादक कंपनीने ‘नोकिया सी20 प्लस’ हा अत्यंत लोकप्रिय अशा नोकिया सी-सीरिज स्मार्टफोनचा भाग असलेला नवीन फोन भारतात ‘रिलायन्स जिओ’च्या विशेष भागीदारीसह सादर केला आहे.


नोकिया स्मार्टफोनची भारतातील सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी मालिका म्हणून सी-सीरिज ओळखली जाते. या श्रेणीमध्ये ग्राहकांना ‘जिओ-एक्सक्लुझिव्ह प्रोग्रॅम’साठी नावनोंदणी करण्याची अनोखी संधी मिळते. त्यातून त्यांना फोनच्या किंमतीवर 10 टक्के किंवा 1000 रु. (जी रक्कम कमी असेल, ती) सूट मिळेल. त्याचप्रमाणे, सणासुदीचे दिवस जवळ आल्याच्या निमित्ताने ‘जिओ-एक्सक्लुझिव्ह प्रोग्रॅम’चा भाग म्हणून ग्राहकांना 4000 रुपये किंमतीचे अतिरिक्त लाभ मिळू शकतील.

‘नोकिया सी20 प्लस’ या फोनची 6.5” एचडी+ स्क्रीन, दोन दिवस  चालणारी बॅटरी, 1.6 गीगाहर्ट्झचा ऑक्टा-कोअर प्रोसेसर, ड्युअल रियर कॅमेरा आणि नवीनतम ‘अँड्रॉइड™ 11 ऑपरेटिंग सिस्टम (गो एडिशन)’ या वैशिष्ट्यांमुळे हा फोन काम, अभ्यास व खेळ या सर्वांमध्ये आपला विश्वासू व भरवशाचा तंत्रज्ञान साथीदार होऊ शकतो. या नवीन स्मार्टफोनमध्ये नोकिया स्मार्टफोनची खास गुणवत्ता, ‘फेस अनलॉक’सारखी गोपनीयतेची वैशिष्ट्ये आणि एक आकर्षक व स्टाईलिश डिझाइन यांचे अनोखे मिश्रण आहे. एक वर्षाची बदलून देण्याची हमी या फोनला देण्यात आली आहे.

‘नोकिया सी-सीरिज’मध्ये ‘नोकिया सी01 प्लस’ आणि ‘नोकिया सी30’ यांचाही समावेश आहे. हे फोन भारतात येत्या सणासुदीच्या काळात सादर करण्यात येणार आहेत.
नवीन ‘नोकिया C01 प्लस’ हा ‘एंट्री लेव्हल’ ग्राहकांसाठी सर्वात परवडणारा 4जी नोकिया स्मार्टफोन असेल. भारतात कोरोना साथीच्या काळात ‘डिजिटल अॅक्सेस’ची गरज भागविण्यासाठी आपल्या फीचर फोनचे अपग्रेडेशन करण्याची अनेक ग्राहकांची इच्छा आहे. तुम्हाला या फोनची ‘क्रिस्टल क्लीअर 5.45 एचडी+’ स्क्रीन आवडेल. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर संपूर्ण दिवस चालते. त्यामुळे तुम्हाला काम आणि खेळ या गोष्टी अखंडपणे करता येतात. पुढच्या आणि मागच्या 5 एमपी कॅमेऱ्यांमध्ये ‘एचडीआर’सह ‘एलईडी फ्लॅश’ आहेत. त्यामुळे आपल्याला स्पष्ट आणि तेजस्वी फोटो व व्हिडिओ मिळतात. ते आपण फोनच्या विस्तारीत मेमरीत ठेवू शकतो.

‘अँड्रॉइडTM 11 (गो एडिशन)’ या नवीन ओएसमुळे तुमच्या फोनमधील एका अॅपमधून दुसऱ्यामध्ये स्विच करण्याची क्रिया सुरळीत व सोपी होते. नोकिया स्मार्टफोन्सच्या नेहमीच कठोर चाचण्या घेतल्या जातात. टिकाऊपणा व उत्कृष्ट बांधणी ही या फोन्सची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यातच 1 वर्षाची ‘रिप्लेसमेंट गॅरंटी’ देण्यात आल्यामुळे, ज्यांना ‘फीचर फोन’वरून ‘स्मार्टफोन’मध्ये अपग्रेड करायचे आहे, अशा ग्राहकांसाठी ‘नोकिया सी01 प्लस’ हा अगदी योग्य पर्याय ठरतो.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: