गोवा 

ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष नोनू नाईक ‘आप’मध्ये

पणजी :
ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आणि बेतकी-खांडोळाचे माजी  पंच सदस्य नोनू नाईक यांनी ‘आप’मध्ये (aap) प्रवेश केला. नोनू नाईक हे माशेल येथील पत्रकार संघाचे संस्थापक सचिव असून त्यांनी पत्रकार म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. 1982-1992 पर्यंत त्यांनी ग्रामीण विकास संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ट्रिसियम योजनेअंतर्गत गोव्यातील विविध भागात शिक्षक म्हणून देखील काम केले आहे. नवनिर्माण अभियान फोंडा तालुका प्रमुख म्हणून बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानाचा ते एक भाग होते. ते बेतकी खांडोळा ग्राहक सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष आणि ऑल गोवा अंगणवाडी कर्मचारी संघाचे माजी सचिव होते.

आप प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शैक्षणिक क्षेत्रातील काम आणि त्यांनी जाहीर केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते. प्रियोळ  मतदारसंघातील लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी आमदार का प्रयत्न करत नाहीत? अस प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला तसच  प्रियोळच्या विकासासाठी मी काम करणार आहे अस हि ते म्हणले ”

आप हा गोवेकरांसाठी पर्याय आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीत केलेल्या कामामुळे मी प्रभावित झालो आहे आणि मला राज्यात असे प्रामाणिक प्रशासन पहायचे आहे. म्हणून मी AAP मध्ये सामील झालो अस नाईक म्हणाले.

“आप’चा गोव्यात झपाट्याने विस्तार होत आहे. गोवेकरांना भविष्यासाठी आप (AAP) एकमेव पर्याय दिसत आहे. पक्ष अनेक मुद्दे उचलून धरत असून याकडे भाजप आणि कॉंग्रेस या दोघांनी वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले आहे. अरविंद केजरीवाल यांचे व्हिजन पुढे नेण्यासाठी नोनू नाईक सारखे नेते पक्षात सामील झाले आहेत” असे राहुल म्हांबरे आप गोवा संयोजक म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: