गोवा 

ध्रुव स्पोर्ट्स क्लब तर्फे योग दिन साजरा

पेडणे (प्रतिनिधी) :

पार्से येथील ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असलेल्या ” खाजनगुंडो बंधाऱ्यावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.यावेळी पतंजलीचे योग प्रशिक्षक विनायक कानोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी विविध योग प्रकार सादर केले.

यावेळी ध्रुव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर यांच्या सहित क्लबचे पदाधिकारी शेखर पार्सेकर,निलेश कलंगुटकर ,तुषार गोवेकर,निलेश बागकर संदीप कांबळी,सिद्धेश नाईक, गौरेश नाईक,सितारा मांद्रेकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना ध्रुव क्लबचे अध्यक्ष दीपक कलंगुटकर म्हणाले की योग ही आपल्या देशाने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे तिचा वापर आपण करायला हवा आपल्या ऋषीमुनींनी आरोग्य संपन्नतेसाठी योगविद्या आत्मसात केली. आजचा युवक याकडे आकृष्ट होण्यासाठी अश्या कार्यक्रमांची गरज आहे.
खाजनगुंडो सारखा निसर्गरम्य परिसरात आज होत असलेला योग दिन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.अश्या पर्यटनस्थळांचे पावित्र्य त्यामुळे खरेच वाढणार आहे.असे त्यांनी सांगितले.
योग प्रशिक्षक विनायक कानोलकर यांनी यावेळी योगा संबंधी माहिती दिली.तसेच योगांचे वेगवेगळे प्रकार दाखवून त्याचा आपल्या आरोग्यासाठी कसा योग्य वापर करता येईल ते प्रात्यक्षिकासह समजावून दिले. निलेश कलंगुटकर यांनी आभार मानले.
yoga day
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: