क्रीडा-अर्थमत

‘नूवोको विस्तास’चा 5 हजार कोटींचा आयपीओ 

मुंबई :
नूवोको विस्तास कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील पाचवी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे आणि क्षमतेच्या बाबतीत पूर्व भारतामधील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जाते. हा भारतामधील एक अग्रगण्य रेडी मिक्स कॉंन्क्रीट निर्मातादार आहे (स्त्रोत: क्रिसिल रिपोर्ट). 31 मार्च, 2021 रोजी कंपनीकडे 11 सिमेंट प्रकल्प होते. त्यांची एकत्रित स्थापित निर्मिती क्षमता 22.32 एमएमटीपीए MMTPA होती.

 

कंपनीच्या नेतृत्व टीमची जबाबदारी चेअरमन व नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हिरेन पटेल आणि मॅनेजिंग डायरेक्टर जयकुमार कृष्णास्वामी यांच्याकडे आहे.

 

नूवोको विस्तास इक्विटी शेअरचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (ऑफर”) खुला करण्यासाठी प्रस्तावित असून हा व्यवहार सोमवार, 09 ऑगस्ट 2021 रोजी खुला होत असून बुधवार, 11 ऑगस्ट, 2021 रोजी बंद होईल. इक्विटी शेअरचा किंमतपट्टा प्रस्ताव प्रती समभाग रु. 560 – रु. 570 राहील.

 

रु. 5,000 कोटींचा एकंदर प्रस्ताव असून इक्विटी शेअरच्या ताजा इश्यूत सरासरी रु. 1,500 कोटी आणि नियोगी एन्टरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड द्वारे इक्विटी शेअर विक्री प्रस्ताव सरासरी रु. 3,500 कोटींचा (प्रवर्तक विक्रेता समभागधारक”).

या व्यवहाराच्या ताज्या प्रस्तावातून जमा होणाऱ्या रु. 1,350 कोटी उत्पन्नाचा विनियोग कंपनीने घेतलेल्या कर्जाचा परतावा/पूर्व-भरणा/रिडप्शन, पूर्ण किंवा काही भागात, करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणास्तव करण्यात येईल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे प्रस्तावाचे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत.

कंपनी आणि विक्रेते समभागधारकांनी, बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”)च्या सल्ल्यानुसार, पायाभूत गुंतवणूकदारांचा सहभाग निश्चित केला असून पायाभूत गुंतवणुकदारांची बोली दिनांक बोली/प्रस्ताव खुला होण्याच्या तारखेपासून, म्हणजे शुक्रवार, 06 ऑगस्ट 2021 च्या एक कार्यालयीन दिवसापूर्वी असेल. हा प्रस्ताव सिक्युरिटी कॉन्ट्रक्टस रेग्युलेशन रूल 1957च्या 19(2)(बी) सुधारणेनुसार (“एससीआरआर”), नियमन 31 नुसार आहे. हा प्रस्ताव सेबी आयडीसीआर नियम सुधारणेनुसार नियम 6(1) आधारीत बुक बिल्डींग प्रोसेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे, ज्यात पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी)साठी 50% पेक्षा जास्त नाही तेवढा भाग, विना-संस्थात्मक गुंतवणुकदार (नॉन इन्स्टीट्युशनल इनवेस्टर्स)’ना ऑफरच्या 15% पेक्षा कमी नाही तेवढा भाग, आणि रिटेल गुंतवणुकदार (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना ऑफरच्या 35% पेक्षा कमी नाही तेवढा भाग वाटपासाठी उपलब्ध राहील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: