Homeगोवा 

नाईबाग पुलाजवळ बुडाली ‘ओम्नी’

पेडणे (प्रतिनिधी) :
आज सकाळी10.30वाजता  नाईबाग येथे मारुती ओम्नी  गाडी नंबर GA-01-S -6649 तुकाराम कुडव यांच्या मालकीची गाडी नाईबाग पुला मध्ये बुडाली, गाडी मध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही
दरम्यान, एकनाथ तेली याने दूरध्वनी वरून अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. वेळ न दडवता अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आधुनिक  व दोरीचा वापर करून गाडी सुखरूपपणे पाण्यातून वर काढली व मालकाच्या ताब्यात देण्यात आली. यात अग्निशामक दलाचे जवान प्रदीप असोलकर, चालक प्रशांत देसाई, जवान अमित सावळ, जवान लक्षदीप हरमलकर यांनी चांगली कामगिरी केली. प्रशांत धारगलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जवानांनी काम केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: