गोवा 

कोरोना महामारीमुळे ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

पेडणे (प्रतिनिधी) :
मोरजी येथील पहिल्या बाल पुरस्कार विजेत्या आणि नृत्यागना वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांच्या बाल शिष्या कुमारी मानसी सुचिता निवृत्ती शिरोडकर , कुमारी आरल मोरजे व  आशी मोरजे यांनी नुकतेच आपल्या गुरुजनांचे ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी केली.
मोरजी येथे सुचिता शिरोडकर यांच्या निवास्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कलाकार सूचिता शिरोडकर , शिक्षिका तन्वी परब , सागर मोरजे , पत्रकार मकबूल माळगीमणी , निवृत्ती शिरोडकर आदी उपस्थित होते , सुरुवातीला बालकलाकार आणि उपस्थित मान्यवरांनी नटेश्वर मृतीचे पूजन केले , त्यानंतर ऑनलाईन गुरुजन वैष्णवी जोशी यांचे मानसी , आरल व आशी यांनी पूजन केले , वैशावी जोशी यांनी सुरुवातीला आपल्या शिष्याना गुरु विषयी कान मंत्र दिला . त्यानंतर विधार्थ्यांनी  आपल्या गुरूसमोर नृत्य सादर केले .शिक्षिका तन्वी परब यांचे कुमारी मानसी यांनी पूजन केले व त्याना भेटवस्तू दिली .

या वेळी निवृत्ती शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त करताना जीवनात गुरूला अनन्य महत्व आहे , गुरुविना विद्या व्यर्थ आहे , प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हायची असेल तर गुरूंचे मार्गदर्शन म्हत्वाचे असल्याचे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: