लेख

‘अशी’ रोखता येईल ऑनलाईन व केवायसी फसवणूक

​गेल्या काही दिवसांत केवायसी अपडेट करण्याबद्दल अनेकांना फोन येत आहेत. ​हे कॉल दिशाभूल करणारे तथा फसवे आहेत हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर हि फसवणूक टाळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबद्दल एक निवेदन ‘वी’ कम्पनीच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार… 

 

आमच्या असे निदर्शनास आले आहे कीवीच्या काही ग्राहकांना अनोळखी क्रमांकावरून एसएमएस व कॉल्स येत आहेत ज्यामध्ये त्यांना त्यांचे केवायसी तातडीने अपडेट करण्यास सांगितले जात आहे.  फसवणुकीच्या उद्देशाने एसएमएस आणि कॉल्स करणारे हे लोक स्वतः कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात आणि केवायसी अपडेट न केल्यास सिम ब्लॉक होईल अशी भीती देखील युजर्सना दाखवतात.  ते लोक तपासणीची बतावणी करून ग्राहकांकडून काही गोपनीय माहिती देखील काढून घेतात.

 

वी आपल्या सर्व ग्राहकांना अशा अनधिकृत कॉल्स व एसएमएस विरोधात जागरूक राहण्याची विनंती करत आहे.  वी ग्राहकांना आम्ही असा सल्ला देत आहोत की त्यांनी आपले केवायसी तपशील किंवा कोणताही ओटीपी कोणालाही कॉलवर देऊ नयेअशा कॉल क्रमांकावर पुन्हा कॉल करू नये तसेच एसएमएसमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नये.

आम्ही ग्राहकांना सूचित करू इच्छितो कीजिचा खरेखोटेपणा तपासण्यात आलेला नाही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केल्याने किंवा आपली कोणतीही माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीला दिल्याने तुमच्या मोबाईल डिव्हाईसमधील माहिती चोरली जाऊ शकते आणि याचे इतरही अनेक गंभीर नुकसानकारक परिणाम होऊ शकतात.

कंपनीकडून ग्राहकांना पाठवले जाणारे सर्व संदेश हे फक्त या एसएमएस आयडीवरूनच पाठवले जातात.  या एसएमएस आयडीवरून न आलेल्या कोणत्याही एसएमएसवर अजिबात विश्वास ठेऊ नये आणि त्या एसएमएसमध्ये करायला सांगितलेल्या गोष्टी अजिबात करू नयेतत्यातील लिंकवर क्लिक करू नये.

आमच्या ग्राहकांना आणि व्यवसायांना डिजिटल जगामध्ये यशस्वी होता यावे यासाठी त्यांचे सर्वात विश्वसनीय आणि मौल्यवान साथीदार बनण्यासाठी वी वचनबद्ध आहे.”       

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: