सातारा 

‘समिती स्थापन न करताच मुख्याधिकाऱ्यांनी निधी केला खर्च’

पाचगणी नगरपालिका घोटाळा भाग : ७

सातारा (महेश पवार) :
पाचगणी – महाबळेश्वर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणुन घोषित आहे. याठिकाणी पर्यावरण विषयक अनेक कायदे ‘कागदोपत्री’ अस्तित्वात आहेत.परंतु याकडे शासकीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसुन येते.
पाचगणी नगरपालिका यांना महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ मधील वैधानिक तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरण समिती ची स्थापना करणे बंधनकारक होते. तसेच वृक्ष प्राधिकरण निधीची स्थापना करणे कायद्याने बंधनकारक होते. परंतु पाचगणी नगरपालिकेने अशी कोणतीही समितीचं स्थापन केली नसल्याचे कळवले आहे. वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन नसताना पाचगणी नगरपालिकेने कोट्यवधीची वृक्ष लागवड केली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगरपालिकेने त्यांना वर्षाला टॅक्स मधुन मिळणाऱ्या उत्पन्नातून वृक्ष लागवड केल्याची आकडेवारी सादर केलेली आहे,परंतु त्याच वेळी नगरपालिकेला टोल मधुन मिळणाऱ्या उत्पन्नातून देखील वृक्ष लागवड केल्याचे टोल अधिकारी यांनी कळवले आहे. वृक्ष लागवडीसाठी दाखवलेला खर्च व प्रत्यक्ष टोल वसुली मधील पैशातून केलेली वृक्ष लागवड यांध्ये तफावत दिसून येते.याबाबत मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांना जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी खर्चाचा तपशील मागणी केली असता ती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ का करीत असावेत.

कायदा काय सांगतो :
नगरपालिका स्थायी निदेश १९ व महाराष्ट्र ( नगरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ कलम ३ अन्वये जिल्हाधिकारी यांनी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन झाल्याची खातरजमा वेळोवेळी करून घ्यावी व अशा स्वरूपाची स्थापना केली नसल्यास अध्यक्षांनी त्यांच्यावर असणारी वैधानिक जबाबदारी पार पाडण्यास कुचराई केली म्हणून तसा अहवल शासनाला सादर करणे बंधनकारक आहे.

अधिनियमातील तरतुदीनुसार उक्त निर्देशानुसार  अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रात अभिप्रेत असलेली कार्यवाही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने पार पाडावी यात कुचराई केल्यास त्याची गंभीर दखल घेण्याची तरतूद कायद्यात आहे.

तरी पाचगणीत सारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात मुख्याधिकारी हेच पर्यावरण कायद्याचे उल्लघंन करणार असतील तर पुन्हा एकदा ‘कुंपणच शेत खाते’ अशी तऱ्हा पाचगणीची झालेली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: