सातारा 

पालिकेच्या मेहरबानीने व्यावसायिकांनी केला वारसा नष्ट

पाचगणी नगरपालिका घोटाळा भाग : ४

सातारा (महेश पवार) 
पाचगणीची ओळख ही या ठिकाणी असणाऱ्या ब्रिटिशकालीन वास्तू तसेच नैसर्गिक संपन्नता यामुळे जगभरात पसरलेली आहे. देश – विदेशातील ६ लाखापेक्षा जास्त पर्यटक पाचगणीला दरवर्षी भेट देत असतात. या ठिकाणी बऱ्याच हेरिटेज वारसा मिळकती आहेत ज्याची नोंद शासन दरबारी असून हे बांधकामे देशाचा वारसा म्हणुन जतन करण्याची कायद्यात तरतूद आहे.
परंतु हे जतन करण्याची जबाबदारी ज्या मुख्याधिकारी यांच्यावर होती त्यांनीच व्यावसायिकासोबत ‘अर्थ’पुर्ण तडजोडी करीत हेरिटेज कमिटीची मान्यता न घेता नियमबाह्य परवानगी दिली. या परवानगीचा गैरफायदा घेऊन सदर व्यावसायिकाने संपुर्ण हेरिटेज वारसा मिळकती नष्ट करून त्या ठिकाणी नवीन इमारती उभ्या केल्या.
हेरिटेजची दुरुस्ती परवानगी घेतली असताना त्याठिकाणी बांधकाम दिलेल्या परवानगीनुसार होते की नाही या देखरेख करण्यासाठी नगरपालिकेत बांधकाम विभाग असतो परंतु संपुर्ण हेरिटेज वारसा नष्ट करेपर्यंत नगरपालिकेचा एकही अधिकारी त्या ठिकाणी फिरकला नाही हे विशेष,
‘मुळात मुख्याधिकारी यांनी दिलेली परवानगीच नियमबाह्य असल्याचे उघड झाले आहे.

कायदा काय सांगतो –
महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०९ जानेवारी २०१३
मधील तरतुदीनुसार हेरिटेज वारसा मिळकती ला बांधकाम परवानगी देण्यापूर्वी मुख्याधिकारी यांनी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या हेरिटेज कमिटी ची मान्यता घेणे बंधनकारक आहे.तसेच बांधकाम परवानगी दिल्यानंतर देखील या समितीला बांधकामाचा प्रोग्रेस रिपोर्ट देणे बंधनकारक असते.

तरी मुख्याधिकारी यांना या गोष्टीची कल्पना होती की बांधकाम दुरुस्ती परवानगी देताना हेरिटेज कमिटी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल घेते व धोकादायक नसेल तर परवानगी देत नाही, याची कल्पना मुख्याधिकारी यांना असल्याने मुख्याधिकारी यांनी संबधित व्यावसायिकाला हेरिटेज कमिटी ची मान्यता न घेता  नियमबाह्य परवानगी पदाचा गैरवापर करीत दिली,व  संपूर्ण हेरिटेज नष्ट झाले तरी देखील हेरिटेज समितीला याबाबत कल्पना दिली नाही.

अशा पद्धतीने पाचगणी नगरपालिकेने पाचगणी हेरिटेज वारसा यादी मधुन अजुन एक हेरिटेज इमारत नष्ट होण्यास सहकार्य केले.

तरी याबाबत देशाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची कायद्यात तरतूद असताना,तो संगनमत करून नष्ट केल्याबाबत फौजदारी गुन्हा व्हावा ही अपेक्षा,याबाबत चौकशी समिती आपला अहवाल सादर करणार आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कारवाई करतील ही अपेक्षा. व पाचगणी चा ऐतिहासिक वारसा जतन होईल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: