कला-साहित्यगोवा देश-विदेश

लेखिका, शिक्षणतज्ज्ञ मारिया आवरोरा कुतो यांचे निधन

मडगाव :
जागतिक दृष्ट्रीकोन असलेल्या विचारवंत आणि प्रसिद्ध भारतीय साहित्यिक पद्मश्री मारिया आवरोरा कुतो (80) यांचे आज सकाळी बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये अल्पकाळाच्या आजाराने निधन झाले.

आपल्या ‘गोवा : अ डोटर्स स्टोरी’ या आत्मचरित्रपर पुस्तकामुळे संपुर्ण भारतात गाजलेल्या हळडोणा स्थित या लेखिकेला सर्दीचा त्रास व्हायला सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वी गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

तिथे त्यांच्यावर उपचार चालू असताना आज सकाळी 10 च्या सुमारास त्यांचे निधन झाले अशी माहिती त्यांच्या परिचित वर्तुळातून मिळाली. त्यांच्या मागे तीन पुत्र व एक कन्या असा परिवार असून गोव्याचे माजी मुख्य सचिव स्व. आल्बन कुतो यांच्या त्या पत्नी होत्या.
व्यवसायाने निवृत्त प्राध्यापिका असलेल्या आवरोरा कुतो यांनी इंग्रजी मधून विपुल साहित्य निर्माण केले असले तरी त्या कोंकणी भाषा आणि साहित्याच्या खंद्या समर्थक होत्या. एक सहृदयी विदुषी म्हणून त्या परिचित होत्या. गोव्यात डी. डी. कोसंबी विचार महोत्सव सुरू करण्यामागे त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन 2010 साली केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.

गोव्यातील प्रख्यात पद्मश्री मारिया आवरोरा कुतो यांच्या आकस्मिक निधनाने तीव्र दु:ख झाले. शिक्षण, संस्कृती आणि वारसा या क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि अनुयायांप्रती माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: