देश-विदेशसिनेनामा

​पाक बनवणार ‘बाबर’​वर बायोपिक

इस्लामाबाद :

बाबर साम्राजाचा संस्थापक सम्राट बाबरच्या कारकिर्दीवर आता पाकिस्तान सिनेमा तयार करत असून, यासाठी त्यांनी उझबेकीस्तानची मदत घेतली आहे.

​पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घोषणा केली आहे की इस्लामाबाद आणि ताश्कंद पहिल्या मुघल शासक जहीरुद्दीन बाबरवर चित्रपट बनवेल. जेणेकरुन दोन देशांमधील सामायिक वारशाबद्दल युवकांना शिक्षित करता येईल. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झीयोयेव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत इम्रान खान म्हणाले की, ‘महान मुघलं शासकापैंकी एक पहिले जहीरुद्दीन बाबर यांच्यावर चित्रपट बनवण्याचा आम्ही आता निर्णय घेतला आहे ते फारच रोमांचक आहेत.’

पंतप्रधान खान पुढे म्हणाले, बाबरच्या घराण्याने 300 वर्षे भारतवर राज्य केले, बाबरच्या काळात भारत हा जगात सर्वात श्रीमंत होता.  खान पुढे म्हणाले, “मला वाटते की उझबेकिस्तान आणि पाकिस्तानच्या युवकांना मुघल शासक बाबरपासून असलेल्या शेकडो वर्षांच्या संबंधाविषयी जाणून घेता येणार आहे. जगातील या भागाच्या आणि आपल्या भागाच्या संबंधाची परिपूर्णता समजून घेता येईल. दरम्यान अस्तित्त्वात असलेल्या संबंधांबद्दल आपणाला माहिती असली पाहिजे.” हा चित्रपट आणि मिर्झा गालिब, अल्लामा इक्बाल, इमाम बुखारी यांच्यावर बनवण्यात आलेले चित्रपट हे या दोन्ही देशातील लोकांना जोडण्याचा पूल असणार आहे.

babur

पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, ‘आम्हाला आशा आहे की ही दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणची सुरूवात होईल. दोन्ही देशामधील संबंध जस जशे संबंध दृढ होत जातील तसतसे मी उझबेकिस्तानच्या लोकांना क्रिकेटची ओळख करुन देईन. ‘त्याच बरोबर अध्यक्ष मिर्झीयोयेव यांनी इम्रान खान यांच्या मताचे समर्थन केले आणि दोन्ही देशांमधील तरुणांना बाबरच्या काळाशी संबंधित असलेली संस्कृती जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, इस्लामाबादमध्ये मशिदी, समाधी आणि शाळा त्यांच्या पूर्वजांनी बनविल्या आहेत हे देशातील फारच थोड्या तरुणांना माहिती आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: