सिनेनामा

कसे साकारते सुमधुर गीत?

समजून घ्या 'पलाश अग्नी स्टुडिओ'च्या कार्यशाळेतून...

मडगाव :

सम्राट क्लब, मडगावच्या वतीने पलाश अग्नी स्टुडियोस आणि अंतर्नाद क्रियेशन्स ह्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गीत जन्मताना (कवन तें  गायन) ह्या गीत लेखन ते गायन पर्यंतच्या प्रवासाची ओळख घडवणाऱ्या पांच दिवसीय ऑनलायन कार्यशाळांचे आयोजन केले आहे. ह्या कार्यशाळांत गोव्याचे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळांची माला 20 जुलै रोजी सुरू होउन 24 जुलै रोजी तिचा समारोप होईल. पलाश अग्नी स्टुडियोसच्या फेसबूक पेजवर ह्या कार्यशाळांचे दर दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

 

ह्या कार्यशाळांत गीत लेखन ह्या विशयावर साईश पाणंदिकर आणि डॉ. राजय पवार, संगीत ह्या विशयावर यतीन तळावलीकार आणि दिलीप वझे, संगीत- वाद्य संयोजन ह्या विशयावर विष्णू शिरोडकार आणि सिंधुराज कामत तर गायन ह्या विशयावर डॉ. प्रवीण गांवकार आणि अक्षदा तळावलीकार हे कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात गीत लेखन ते गायन पर्यंतच्या प्रवासावर हे मार्गदर्शक एकत्र येऊन गट चर्चा करतील. प्रसिद्ध सुत्रनिवेदक गोवींद भगत ह्या सत्राचे संचलन करतील.

पलाश अग्नी स्टुडियोस ह्यांनी आयोजीत केलेल्या सुत्र सप्तक ह्या ऑनलायन सुत्रसंचालन कार्यशाळांच्या माळेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून स्पूर्त घेउन गीत जन्मताना ही संकल्पना सम्राट क्लबाने उचलून धरली आहे. गोव्या बरोबरच भारतातील इतर राज्यांतीलही कलाकारांना ह्या कार्यशाळांचा खात्रीने उपयोग होईल म्हणून मोठ्या संख्येने ह्या कार्यशाळांना उपस्थिती लावण्याचे आवाहन सम्राट क्लब मडगांवचे अध्यक्ष पराग रायकार, पलाश अग्नी स्टुडियोसचे पलाश अग्नी आनी अंतर्नाद क्रियेशन्सचे यतीन तळावलीकार ह्यानी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: