गोवा 

‘…म्हणून भाजप सरकार खेळते आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी’

मडगाव :

भाजप सरकार सामान्य लोकांना संकटात टाकून केवळ धनाड्यांना मदत करण्याचे धोरण राबवित आहे. मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात इंटरनेट सेवेचे कंत्राट घालण्यासाठीच गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे खेळ मांडला आहे असा गंभीर आरोप कॉंग्रेसच्या प्रवक्त्या पल्लवी भगत यांनी केला आहे.

गोव्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन वर्गांपासुन वंचित व्हावे लागत आहे. कोविड महामारी सुरू होवून दिड वर्ष झाले तरी भाजप सरकारने अजुनही शैक्षणिक कृती आराखडा तयार केलेला नाही. गेल्या वर्षीच इंटरनेट नेटवर्कची समस्या ऐरणीवर आली होती. परंतु बेजबाबदार भाजप सरकारने त्यावर उपाययोजना केली नाही. त्यामुळेच आता विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक यांना नाहक त्रास व कष्ट सहन करावे लागत आहेत.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गोव्याला भेट दिलेली इंट्रानेट ऑप्टिक फायबर सेवा पुर्ण क्षमतेने कार्यांवित करण्याची मागणी केली होती. गोव्यातील प्रत्येक पंचायतीच्या दारात पोचलेली ही सेवा सरकारने योग्य प्रकारे हाताळल्यास इंटरनेटचा प्रश्न कायमचा सुटणार असे वारंवार भाजप सरकारला दिगंबर कामत यांनी सांगुनही सरकारने जाणिवपूर्वक त्यावर ठोस उपाययोजना केली नाही असे पल्लवी भगत यांनी म्हटले आहे.

गोव्यात उपलब्ध असलेले इट्रानेटचे गोवा ब्रॉडबेंडचे जाळे आज सरकारी कार्यालये, अनेक स्थानिक टिव्ही चॅनल यांना अखंडितपणे सेवा देत असुन, सरकारने हे जाळे विस्तारल्यास संपुर्ण गोव्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा पल्लवी भगत यांनी केला आहे.

भाजप सरकारला उपलब्ध असलेल्या नेटवर्कचा विस्तार करायचा नसुन, मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात गोव्यातील इंटरनेट सेवा घालण्यासाठीच सरकार मुद्दामहून इंट्रानेटचा विस्तार रोखत आहे. आज सरकारच्या संगनमतानेच अनेक ठिकाणी गोवा ब्रॉडबॅंड सेवेचे केबल कापुन ह्या नेटवर्क सेवेला अपशकुन करण्याचा प्रयत्न होत आहे . भाजप सरकारने जसे बिएसएनएलचे जाळे जाणिवपुर्वक उध्वस्त केले तसेच इंट्रानेटचे जाळे नश्ट करुन मोदींच्या अंबानी-अदानीना संपुर्ण गोव्याची इंटरनेट सेवा बहाल करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे असा आरोप पल्लवी भगत यांनी केला आहे.

भाजपच्या भांडवलशाही धोरणांने आज गोव्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावे लागत असुन, सरकारच्या नाकर्तेपणाने विद्यार्थ्यांचे भवितव्यच धोक्यात आले आहे. सरकारने ताबडतोब इंट्रानेट सुविधा कार्यांवित करावी व त्यांचे थेट कनेक्शन सर्व शाळांना द्यावे अशी मागणी पल्लवी भगत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केवळ कमिशन खाण्यासाठीच गोव्यात मोबाईल टॉवर घालण्यावर लक्ष केंद्रित करीत असुन, उपलब्ध असलेल्या ब्रॉडबॅंड सेवेकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: