गोवा 

पार्सेतील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळाची झाली दुरावस्था 

पेडणे (निवृत्ती शिरोडकर)

निसर्गसंपन्न पार्से गावात पर्यटनाला वाव देण्यासाठी आणि दुहेरी लाभ मिळवून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जलसिंचन खात्याचा साडे तीन कोटी रुपये खर्च करून खाजनगुंडो मानसी आणि बांध परिसराचे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि परिसरातील शेती व्यवसायीकांना लाभ मिळवून देण्यासाठी या परिसराचे सुशोभीकरण केले. हा परिसर पर्यटकांना शिवाय चित्रपट निर्मात्यानाही आकर्षित केला जात आहे .अनेक लहान मोठ्या लघु चित्रपट , व्यावसायिक जाहिरातीचे चित्रीकरण केले जाते , शिवाय प्रेमी युगालांचे एक खास स्थळ बनत आहे.

पण सध्या रात्री अपरात्री या ठिकाणी नागरिकांची वर्दळ दिसून येते . काही युवकही झाडाच्या बाजूला बसून ड्रग्स सेवन करतात. काहीजण बियरच्या बाटल्या घेवून तासंतास बसलेले असतात , बियरच्या बाटल्या परिसरात फेकून देवून परिसर विद्रूप आणि अस्वच्छ करतात , मागच्या वर्षी स्थानिक पंच सदस्य आणि वायडोंगर परिसरातील ग्रामस्थ महिलांनी एकत्रित येवून हा परिसर स्वच्छ केला होता .

तालुक्यातील समुद्र किनारे आता हळूहळू ड्रग्स , वेश्या व्यवसाय, ध्वनी प्रदुषणाच्या संगीत पार्ट्या , कचरा , पार्किंग समस्या , या विविध समस्यांमुळे किनारे बदनाम होत असल्याने देशी विदेशी पर्यटक सुद्धा आता नंवनवीन पर्यटन स्थळ शोधताना दिसत आहे किनाऱ्या पलीकडील पर्यटनाला वाव देण्यासाठी सरकारही आपल्या पद्धतीने वर्षाचे ३६५ दिवस पर्यटनाला वाव देण्यासाठी पर्यटनाचा विस्तार करताना चित्र दिसत आहे.

पेडणे तालुक्यातील पार्से हा गाव , निसर्ग संपण गाव म्हणून प्रसिद्ध आहे . मुक्ती लढ्यासाठी याच गावातून पहिला उठाव झाला होता. श्री भगवती मंदिर हे एक पेडणे तालुक्याचे वैभव आहे.  याच गावात पहिली महिला नाटक कंपनी स्थापन झाली होती , पंडित श्रीधर पार्सेकर , भाऊ दाजी लाड याच गावाचे . राज्यात नव्हे तर आशिया खंडात पहिले पारसे येथे ब्रम्हा , विष्णू , महेश्वर अशा तीन देवांच्या वेगवेगळ्या मूर्ती असलेले मंदिर हे याच गावात आहे . देशात हे मंदिर प्रसिद्ध आहे .

पार्से गावाचा वेगळा इतिहास आहे . या गावाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार दिले त्यांनी आपल्या कलेने गाव समृद्ध केला आहे . साहित्य , कला . क्रीडा . सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या गावाने जिल्हा पंचायत सदस्य ते आमदार दिले .पेडणे तालुक्यातील पार्से या निसर्गरम्य गावाला जुना इतिहास आहे , या गावाला समृद्ध असा इतिहास आहे , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिनवादक पंडित श्रीधर पार्सेकर यांच्यासारखे नावाजलेले कलाकार दिले .साहित्य कला , क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात या गावातील व्यक्तींनी भरीव योगदान दिलेले आहे लोकसंखेने गाव लहान असला तरीही कीर्ती मात्र महान आहे .

बांध ठिकठिकाणी खचला 
या बांधाचा ठेका भोमकर याना मिळाला होता यापूर्वीही या बांधला संरक्षण भिंत बांधली होती , त्याच भिंतीवर दुसरी भिंत बांधण्याचा ठेका सरकारने देवून ठेकेदाराचा धंदा  तेजीत चालवला आहे . मागच्या दोन वर्षापूर्वी या भागाचे आमदार दयानंद सोपटे हे विरोधी पक्षाचे आमदार असताना या निकृष्ट कामाविषयी , ठेकेदार अभियंते याना घटनास्थळी आमंत्रित करून आवाज उठवला होता , ठिकठीकाणी खचलेले बांधकाम दुरुस्त करण्याची ग्वाही दिली होती परंतु आज पर्यंत एकदाही दुरुस्ती साठी पाऊले उचललेली नाही , आता तेच आमदार सत्तासाठी असल्याने त्याना सहज हे काम करून घेता येते , त्यांनी ते करून घ्यावे अशी मागणी नागरिक करत आहे .

या भागाचे सुशोभीकरण करतेवेळी शेतकऱ्याना मोठा दिलासा दिला होता , कि या बांधाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतीव्यवसायाला हा बांध उपयुक्त ठरणार असे परतू सध्या उलट झाले आहे . या सुशोभीकरणाचा शेतकऱ्यांना काहीच लाभ झाला नाही. पर्यटकांना हे स्थळ जरी आकर्षित करत असले तरी इथली अस्वच्छता चांगल्या स्थळाला बदनाम करताना दिसत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: