सातारा 

सातारा जिल्ह्यात उद्यापासून अंशतः अनलॉक

सातारा (अभयकुमार देशमुख) :
तारा जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्नांची संख्या पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ८ जून पर्यंत कडक लॉकडॉउन जाहीर केला होता. आजअखेर कोरोना रुग्न वाढण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याने आज सातारा जिल्हाधिकारी यांनी नवा आदेश जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्यापासून अंशत अनलॉक होणार आहे. त्यानुसार सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत  अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जाहीर केलेला  सुधारीत आदेश पुढेलप्रमाणे :
सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यन्त किराणा, भाजीपाला,दूध,बेकरी,चिकन-मटण आदी अत्यावश्यक सेवेतील दुकाने राहणार खुली..शनिवार, रविवार मात्र दुकाने ठेवावी लागणार बंद.

मेडिकल सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत,रुग्णायलातील मेडिकल पूर्णवेळ राहणार सुरु.

वैध कारणाशिवाय सोमवार ते शुक्रवार सायं. 5 ते पहाटे 5 पर्यंत व शनिवार,रविवार पूर्ण वेळ संचारबंदी.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: