गोवा 

पत्रादेवीत पाच लाख ७६ हजारांची दारू जप्त

पेडणे ​(​प्रतिनिधी) :
​​पत्रादेवी चेक नाक्यावर अबकारी विभागाने निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या नैतृत्वाखाली पाच लाख ७६ हजाराची दारू जप्त केली , तर वाहनाची आठ लाख किंमत आहे .

वाहन गोवा मार्गे पनवेल पत्रादेवी येथे जात होते १७ रोजी पहाटे साडेचार वाजता हे वाहन पत्रादेवी अबकारी चेकनाक्यावर पोचले . त्यावेळी चालकाने आपली कागदपत्रे घेवून नाक्यावर आला असता त्यात खत असल्याचे नमूद केले , अबकारी अधिकाऱ्यांना संशय आला. त्यात रॉयल ब्लू विस्की १८० मिलीलीटरच्या ३८४०० बॉटल सापडल्या . वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले .

या धडक कारवाईत उपनिरीक्षक कृष्णा उसपकार , देविदास तिरोडकर , सुनील कार्बोटकर , दशरथ तारी , भगत पागी रुपेश रेडकर व हरीश नाईक आदींनी कारवाई केली. कोरोना काळातील हि तिसऱ्यावेळी मोठी कारवाई केली आहे. या नाक्यावरून अनेकवेळा चोरटी दारूचा व्यवहार चालू असतो .

अबकारी विभाग हा सरकला उत्पन्न लक्ष्मि मिळवून देणारा विभाग आहे . असे खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत  यांनी मागच्या वर्षी  इमारत उद्घाटनाच्या वेळी  जाहीर केले . आणि ज्या एका महिला अबकारी अधिकाऱ्याने गेल्या वर्षी 22 दिवसात  पेडणे अबकारी विभागाला ३५ लाखाची चोरटी दारू जप्त करून दिली , त्याच लक्ष्मिचि सरकारने तडकाफडकी बदली केली . याविषयी पेडणे तालुक्यातून जोरदार चर्चा सुरु होती ,त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी किती दारू जप्त केली त्याचा तपशील द्यावा ,अशी मागणी जनता करत होती आणि आता परत एकदा दारू जप्त करण्यात आली आहे

पेडणे तालुक्यात पत्रादेवी ,आरोंदा- किरणपाणी व न्हयबाग पोरस्कडे या भागात प्रमुख तीन अबकारी नाके आहेत  हे तिन्ही नाके पत्र्याच्या शेडीत उभे आहेत . मात्र हे नाके लुटारूंचे नाके म्हणून नावारूपास येत आहे . या नाक्यावरून बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी किली जात नाही . सीमेबाहेर जाणाऱ्या वाहनातून एक क्लीनर बाहेर येतो हातात एक नोट घेवून तो चेक नाक्यावर येतो तिथे तो नोट टाकतो आणि मग वाहन न तपासता बिन्दास्त निघून जाते . हे चित्र पत्रादेवी अबकारी नाक्यावर सर्रासपणे दिसून येते . यावर  कुणाचेच नियंत्रण नाही .

तीन धाडी ३३ लाख
पेडणे अबकारी विभागाच्या एक महिला अधिकाऱ्यांच्या नैतृत्वाखाली २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर 2021पर्यंत पत्रादेवी चेक नाक्यावर धाडी तीनवेळा टाकून किमान ३२ लाखाची चोरटी दारू जप्त करून सरकारच्या तिजोरीत महसूल जमा केला होता.

हि मोठी कारवाई केली असताना कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी, आमदारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देवून त्या महिलेच्या कार्याबद्दल गोरौद्गार किंवा तिचे अभिनंदन करण्या ऐवजी तिची तडकाफडकी बदली केली .

दरम्यान  मुख्यमंत्री डॉक्टर सावंत हे अबकारी इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते . त्यानंतर त्यांनी पेडणे पोलीस स्टेशनला भेट दिली आणि केरी येथील स्थानिकाकडून एक कोटी चा अमलीपदार्थ जप्त केल्याबद्दल पोलीस निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या टीमचा गौरव केला .मात्र अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र एक प्रकारे शिक्षा का असा सवाल समाजसेवक प्रकाश कांबळी यांनी उपस्थित करून त्या अधिकाऱ्याची बदली का केली त्याची चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले .

चालक पळतात कसे?
अबकारी पत्रादेवी चेक नाक्यावर बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडत्तात . मात्र त्या वाहनात असलेले चालक क्लीनर पळून जातात कसे ? हे गुड मात्र आजपर्यंत कुणालाच कळलेले नाही . सात आठ अबकारी अधिकाऱ्यासोबत कर्मचारी वर्ग असताना एक चालक हा विभाग पकडू शकत नाही त्याविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तालुक्यातील चेक नाके लुटारूनचे केंद्र बनत आहे, अश्या तक्रारी आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: