गोवा 

‘गरजवंतांच्या मदतीसाठी असेन सदैव तत्पर’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

मतदारसंघातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण नेहमीच पुढे असेन. पेडणे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न अनेक वर्ष तसेच आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पेडणेतील समस्या सोडविण्यासाठी  लक्ष दिले नाही.माञ आपण पेडणे मतदारसंघातील समस्या आणि गरजवांताना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच पुढे असेन असे उद्गार  पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रविण आर्लेकर यांनी काढले.

पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर यांच्या तर्फे पेडणे पालिकेच्या सफाई  कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करण्यासाठी अॕपराॕन , जॕकेट व हातमोजे देण्यात आले. यावेळी पञकारांकडे प्रवीण आर्लेकर  बोलताना होते.  यावेळी जयेश पालयेकर , राजन म्हापसेकर आदी उपस्थित होते.

प्रवीण आर्लेकर पुढे म्हणाले , पेडणे मतदारसंघात अनेक समस्या आहेत. गेली अनेक वर्षे त्या सोडविल्या नाहीत. गोरगरीब जनता ही ञस्त आहे.माञ त्यांना कोणीही वाली नाही. पेडणे मतदारसंघात अजूनही काही गावात रस्ते नाही.पाणीपुरवठा होत नाही.तर इब्रामपूर सारख्या गावात अनुसूचित जातीचे लोक राहत असलेल्या   वस्तीत अजूनही शौचालय नाही. यावरुन पेडणेच्या जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी यांनी कोणाचा विकास केला हे दिसून येते असे प्रवीण आर्लेकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: