गोवा 

‘केवळ विरोधासाठी विरोध करत राहू नका’

पेडणे [ प्रतिनिधी ]
राज्यातील सर्व ४० मतदारसंघावर नजर मारली तर केवळ पेडणे मतदारसंघातून येणाऱ्या प्रकल्पातून रोजगाराची हमी आहे.  इतर मतदारसंघात तशी हमी नसल्याचा दावा करून, हि लोकशाही आहे , लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे , मात्र विषय धरून बोलायला हवे , तथ्य नसलेले विडीयो ऑडियो व्हायीरल करून जनतेची दिशाभूल करू नये, केवळ विरोधासाठी विरोध करत राहू नये असे आवाहनं उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.

कोरगाव येथे शिवराज्यभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर  उपस्थित होते , कार्यक्रम संपल्यानंतर ते समर्थकाशी संवाद साधत होते. रस्त्यावर उभे असलेल्या नागरिकांची विचारपूस करत होते , त्याच वेळी काही नागरिकांनी त्याना पाण्याची समस्या, जे वादळ आले आणि स्थानिकांची झालेली नुकसानी त्याकाळात उपमुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल नागरिकांनी केला होता. त्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते. त्याला आज त्यांनी उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले विरोध कमी असले किंवा जास्तच असले तरी आपल्याला फरक पडत नाही ,आपण जो विकास केला तो जनतेच्या लक्षात आहे ,विरोधकांनी आपले काम करावे आम्ही आमची कामे करतो , विरोधकामुळेचे जोरात विकास चालू आहे ,काही विरोधक मुद्दाम आपण विकास केला नाही म्हणून ओरड मारतात ,काहीजण तथ्य नसलेल्या विषयाचे ऑडिओ आणि व्हिडीओ व्हाइराल करतात , त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये सकारात्मक विचार करावा असे सांगितले .

पेडणे तालुक्याच्या विकासाठी अनेक प्रकल्प आपण आणले आहे ,येथली बेरोजगारी हटवण्यासाठी मोपा विमानतळ ,आयुष हॉस्पिटल आणि आंतराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट स्टेडियम येत आहे ,या प्रकल्पातुन रोजगार उपलब्ध होणार आहे आणि ते रोजगार मतदार संघातील बेरोजगार युवकांना मिळणार असल्याचा दावा केला .

विरोधकांनी आपण आमदार होण्यापूर्वी  धारगळ व आताचा पेडणे मतदारसंघात कसा विकास होता याची जाणीव नागरिकांना आहे ,आपण आमदार मंत्री झाल्यानंतर विकासाची कवाडे उघडली गेली असे बाबू म्हणाले.  केवळ मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण पक्षांतर केले ,आता या पुढे कधीच पक्षांतर करणार नसल्याचे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: