गोवा 

‘डॉ. बाबासाहेबांच्या विचारांतून करणार पेडणेचा विकास’

पेडणे (प्रतिनिधी) :
डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पेडणे मतदारसंघातील नागरिकांचा आपण विकास साधणार असून पेडणे या राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार यांनी पेडणे मतदारसंघातील गरीब जनतेकडे कधी पाहिले नाही.मात्र आपण आमदार म्हणून निवडून आल्यास पेडणेतील गरीब जनतेच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविणार आहे. भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज पुतळ्यासाठी मला शिडी तसेच रेलिंग बसविण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो . माझ्या  हातून हे छोटेसे काम झाले या बद्दल अभिमान वाटत असून पेडणे मतदारसंघाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच पुढे असणार असे प्रतिपादन  पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे येथे काढले.

पेडणे पालिका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील पुतळ्याच्या चौथ-याला शिडी नसल्याने कार्यक्रमावेळी फुले तसेच पुष्पहार पुतळ्याला अर्पण करताना गैरसोय होत होती.  गेली  अनेक वर्षे आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जयंती निमित्ताने किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त नागरिकांचे आणि आंबेडकर चळवळीतील नेत्यांचे हाल होत होते. याची गंभीर दखल घेत म.गो.नेते प्रवीण आर्लेकर यांनी पुतळ्याच्या चौथऱ्याला सीडी  तसेच  रेलिंग स्वखर्चाने  बसवून  दिली. त्याचा शुभारंभ प्रवीण आर्लेकर यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व मेणबत्ती प्रज्वलीत करुन  केल्यानंतर प्रवीण आर्लेकर बोलत होते.

यावेळी नेते प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत पेडणे पालिकेचे नगरसेवक शिवराम तुकोजी, म.गो. कार्यकारणी सदस्य सुदीप कोरगावकर,म.गो. प्रवक्ते उमेश तळवणेकर, उपसरपंच  सुबोध महाले, रंगधाराचे अध्यक्ष नितेश पेडणेकर, साहित्यिक चंद्रकांत  जाधव , तुकाराम तांबोस्कर, दिलीप पेडणेकर, रोहन पेडणेकर, साई  पेडणेकर  जयेश पालयेकर, महेश परब, किशोर किनळेकर  , धोंडूराज पेडणेकर, लक्ष्मण पेडणेकर , तुषार पेडणेकर , गुरुदास पेडणेकर आदी  उपस्थित होते.

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वांचित समाजाला न्याय मिळावा त्यांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी देशाच्या घटनेत पंचायत , पालिका , विधानसभा यात आरक्षण ठेवले. या आरक्षणाच्या माध्यमातून निवडून येणारा लोकप्रतिननिधी हा आपला  समाजातील नागरिकांचा  विकास  करेल.   त्यानुसार पेडणे मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. माञ पूर्वीचा धारगळ व आताचा पेडणे या राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून  आलेले बाबू आजगावकर   हे   वीस वर्षे राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून   गरीब जनतेच्या तसेच अनुसुचित जातीतील नागरिकांच्या  समस्या सोडविण्यास अपयशी ठरले  असल्याचे पेडणे मगो पक्षचे प्रवक्ते उमेश तळवणेकर म्हणाले. या आमदाराने  स्वतः चे व आपल्या  कुटुंबाचे हीत जोपासले.ते या मतदारसंघात गरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कमी पडले. गोव्याचे भाग्य  माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी कूळ मुंडकार कायदा आणून कसेल त्यांची जमीनव राहिल त्याचे घर अशी कायद्यात दुरुस्ती केली. , त्यांचे कार्य आज पेडणेत मगो नेते पुढे नेत असून जनतेची तळमळ आणि   गरीबाच्या समस्या सोडविणासाठी काम करत असलेल्या   मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या  मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना पेडणेचा लोकप्रतिनिधी निवडून द्या असे आवाहन उमेश तळवणेकर यांनी केले.

‘डाॕ.बाबासाहेब हे एक समुहापुरते मर्यादित नाहीत’
यावेळी बोलताना साहित्यिक चंद्रकांत जाधव म्हणाले , की डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे एका समुहापुरते मर्यादित नाहीत. तर माहात्मा गांधी , पंडित नेहरु , सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तोडीचे हे व्यक्तीमत्व होते. आज संपूर्ण  जग देशाच्या घटनेबद्दल गौरव उद्गार काढतात.माञ भारतात आजही डाॕ.आंबेडकर यांना एका समुहापुरते मर्यादित असल्याची भावाना आहे.त्यात बदल होण्याची गरज असून त्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. अशा या थोर महापुरुषाच्या स्थळाच्या ठिकाणी गेली अनेक वर्षे कार्यक्रमावेळी होत असलेली समस्या प्रवीण आर्लेकर यांनी सोडविली. आंबेडकर उद्यानात पुतळ्याच्या चौथ-याला रेलिंग तसेच लोखंडी सीडी   बसवल्याबद्दल चंद्रकांत  जाधव यांनी  त्यांना धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी तुकाराम तांबोस्कर यांनी मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी आंबेडकर  पुतळ्याच्या चौथ-याला शिडी बसवून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत त्यांनी असेच आपले कार्य चालू ठेवावे असे सांगितले. दिलीप पेडणेकर  यांनी प्रास्तविक केले.   तुकाराम तांबोस्कर , चंद्रकांत जाधव यांनी  प्रवीण आर्लेकर  व  नगरसेवक शिवराम तुकोजी यांचे   पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. रंगधारा संस्थेचे अध्यक्ष नितेश पेडणेकर यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: