गोवा 

गरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
भारत सरकारने स्वच्छ अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला आणि राज्यात गावागावात ज्याना शौचालय नाही, अशांना शौचालय देण्याची योजना राबवली. बीपीएल यादीत जर नागरिकांचा समावेश असेल तर २५००० हजाराचे शौचालय २५०० हजार भरल्यानंतर मिळते .मात्र तुये पंचायत क्षेत्रात एका गरिबासाठी मंजूर झालेले शौचालय तुये येथील एका हॉटेल मालकाने आपल्या व्यवसायासाठी उभारले , त्याला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप माजी पंच उदय मांद्रेकर यांनी केला आहे , त्यांनी पंचायतीकडे हे सोचालंय हटवण्यासाठी मागच्या एक महिन्यापासून लेखी मागणी केली आहे .

स्थानिक माजी पंच उदय मांद्रेकर यांनी माहिती देताना हे शौचालय एका गरिबासाठी मंजूर झाले होते , ते कुणीतरी राजकीय अधिकार वापरून धारगळ येथील व्यावसायिक आणि त्यांचे हॉटेल सोणये तुये आहे, त्या ठिकाणी ते उभारलेले आहे . हे शौचालय हटवण्यासाठी आपण मागच्या महिन्यापासून मागणी केली आहे , मात्र आजपर्यंत पंचायत काहीच दाखल घेत नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली , स्थानिक ग्रामस्थ आम्हाला विचारतात गरिबाना शौचालय नाही ते व्यावसायिकधाराकाना कसे मिळतात यावर त्वरित पंचायतीने तो हटवावा अशी मागणी केली .

तुये सरपंच सुहास नाईक यांच्याकडे संपर्क साधला असता हे शौचालय एका गरीब लक्ष्मण परब याला आले होते मात्र त्या व्यावसायिकाने परस्पर कंत्राटदाराला हाताशी धरून आपल्या हॉटेल साठी त्यांनी घेतले , तो तुये पंचायतचा मतदारही नाही . त्याविषयी संबधित अधिकाऱ्यांकडे पंचायतीने लेखी कळवले आहे , लवकरच तो हटवला जाईल असे सरपंच सुहास नाईक म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: