गोवा 

मान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
विधानसभेच्या निवडणूक जवळ आल्या कि कॉंग्रेसचे मांद्रे मतदारसंघातून दूर गेलेले स्थानिक नेते आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून आपले घोडे पुढे करत असतात . एकदा काय निवडणुका झाल्या कि पाच वर्षे मतदारांना तोंडही दाखवले जात नाही .निवडणुका जवळ आल्या कि गट बाजी करून उमेदवारी घ्यायची आणि स्वता पराभूत झाल्यानंतर खापर मात्र कार्यकर्त्यावर फोडायचे हि वृत्ती चालीस लागली आहे.

२०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रस पक्षाला मांद्रे मतदार संघातून संजीवनी आमदार दयानंद सोपटे यांनी मिळवून दिली होती , ते कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर कॉंग्रेस पक्षात उत्साह निर्माण झाला . मात्र आमदार दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देत कॉंग्रेसला मोठा धक्का दिला . त्यानंतर २०१९ साली पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला आमदार दयानंद सोपटे यांचा बदला घेता आला नाही , बाबी बागकर याना उमेदवारी मिळाली मात्र ते चार हजाराच्या वरती मते घ्यायला अपयशी ठरले .मात्र त्याच वेळी लोकसभेची निवडणुकाही झाली त्यावेळी मान्द्रेतून कॉंगेस उमेदवार गिरीश चोडणकार याना ८००० हजार मते तर त्यातील अर्धी मते बाबी बागकर हे स्थानिक असूनही मते मिळाली , त्यावरून कॉंग्रेस पक्षात गटबाजी असल्याचे दिसून आले .

२०१९ ची पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे दुसऱ्यांदा मांद्रेचे आमदार बनले . त्यानंतर कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले , कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मतदार संघात आणि कार्यकर्त्यावर पाठ फिरवली . मात्र माजी शिक्षणमंत्री संगीता गोपाळ परब यांचे सुपुत्र सचिन परब यांनी अत्यत कठीण प्रसंगी कॉंग्रेसचे स्वत:कडे ओझे घेवून अस्तित्व अबाधित राखले .विविध उपक्रम स्वत:च्या पैशातून राबवले मात्र तेही कॉंग्रेससाठी. आज मान्द्रेत कॉंग्रेसचे अस्तित्व दिसत आहे ते केवळ युवा नेते सचिन परब यांच्यामुळेच.

कोरोना महामारीच्या काळात सचिन परब यांनी पूर्ण मतदार संघात विविध उपक्रम मदत कार्य सुरु केले , इतर कॉंग्रेस नेत्यांनी या काळात काय केले ते त्यानी स्वत: आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे . मात्र सचिन परब यांनी अविरत कार्य मतदार संघात कोणतीही अपेक्षा न ठेवता केले आहे . आता निवडणुकीत तेच कॉंग्रेस उमेदवारीचे खरे दावेदार आहेत , आणि कॉंग्रेस पक्ष जर कार्याची दाखल घेत असलेल तर सरळ सचिन परब याना उमेदवारी देवून मोकळा होईल . सध्या निवडणुका जवळ आल्याने माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप थोडे सक्रीय झाल्याचे चित्र दिसत आहे , राज्यात कॉंग्रेसची सत्ता नसल्यानेही मान्द्रेत सचिन परब यांनी कॉंग्रेसचे अस्तित्व आजपर्यंत अबाधित ठेवले .

विठू मोरजकर

पेडणे मतदारसंघ :
पेडणे मतदारसंघात २०१७ च्या निवडणुकी अपरिचित विकेश असोटीकर याना उमेदवारी दिली आणि केवळ १००० मते मिळाली , त्यादिवसापासून कॉंग्रेस पक्षच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. उरले सुरले कॉंग्रेस कार्यकर्ते  उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पळवले. अधूनमधून उमेश तळवणेकर विठू मोरजकर सुभाष केरकर आवाज उठवायचे परंतु त्यांचा आवाज कॉंग्रेस पक्षापर्यंत पोचत नव्हता , मध्यंतरी काळात उमेश तळवणेकर यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून मगोत प्रवेश केला, तर सुभाष केरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला . अधून मधून विठू मोरजकर कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी प्रयत्न करतात मात्र त्याला ते झेपत नाही , कार्यकर्त्यांची फळी नसल्याने आणि अधिकाधिक कॉंग्रेस कार्यकर्त्ये उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर , मगोचे प्रवीण आर्लेकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर आणि गोवा फॉरवर्डचे जितेंद्र गावकर यांनी पळवले आहेत , त्यामुळे विठू मोरजकर याना पेडण्यात कॉंग्रेस पक्ष सावरणे कठीण होत आहे. कोरोना काळात कॉग्रेस पक्षाने कोणतेच मदत कार्य पेडण्यात केले नाही. त्याबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत आहे .

सचिन परब

आता पासूनच मांद्रे मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवाराला भाजपचे दयानंद सोपटे व मगोचे जीत आरोलकर यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे . तर पेडणे मधून भाजपाचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर ,मगोचे प्रवीण आर्लेकर , मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर आणि गोवा फॉरवर्ड चे जितेंद्र गावकर यांचा कॉंग्रेस उमेदवाराला सामना करावा लागणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: