गोवा 

वट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप

पेडणे (प्रतिनिधी) :
झाडांचे महत्त्व अनादी काळापासून सर्वजण जाणतात. झाडांचे आणि सजीव जीवनाचे अतूट नाते आहे. तरीही मानव काही बाबतीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. त्याचे परिणाम, तोटे आणि त्यावर उपाय म्हणून झाडे लावणे अपेक्षित आहे. हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला गेला तर भविष्यात आपण निसर्ग समृद्ध करून प्रदूषण कमी करू शकू.अनेक संत, महात्मे, समाज सुधारक झाडांचे महत्त्व सांगून गेले. झाड आणि कुठलेच जीवन वेगवेगळे नाही. झाडांचे जे कार्य चालते ते सजीवसृष्टीला सांभाळून आहे. निसर्गाला आम्ही जपले तरच निसर्ग आम्हाला जपेल, असे प्रतिपादन पेडणे नगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी पालयेकर यांनी केले.

वटपौर्णिमेचे औचित्य साधून पेडणे नगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी पालयेकर व गोवा जैवविविधता खाते यांच्यातर्फे प्रभाग दोनमध्ये विविध प्रकारच्या दीड हजार झाडांचे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वितरण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश वटपौर्णिमेच्या दिवशी दिला व त्यांच्या संगोपनाची प्रतिज्ञा करून वटपोर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी संतोष किनळेकर,उत्तम किनळेकर,प्रतिकेश अमेरकर,साईश किनळेकर,सुशांत अमेरकर,लक्ष्मण तुळसकर,सीमा किनळेकर,उमा किनळेकर,सीमा संतोष किनळेकर,अतिथी किनळेकर,यश पालयेकर, पूनम पालयेकर,त्रिंबक किनळेकर,मनीषा पालयेकर,पवन आंबेकर,यश किनळेकर,शिवम अमेरकर,सुनंदा पेडणेकर आदी उपस्थित होते.

त्या पुढे म्हणल्या की,परिसरात झाडे असणे म्हणजे सुंदरतेचे ते प्रतीक असते. त्यांची सुंदरता आणि हवामान जास्त करून घनदाट जंगलामुळे आहे. निसर्ग, पक्षी, प्राणी किती तादात्म्य साधून आहेत, फक्त माणूस निसर्गापासून तुटत चालला आहे. त्यामुळे आजच निर्धार करूया आणि एकसाथ पुन्हा ते घोषवाक्य झाडे लावा आणि झाडे जगवा म्हणून ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही झाडं वितरित करत आहोत आणि त्यांना झाडे लावण्यासाठी प्रेरित करत आहोत जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला जाईल व भविष्यात सर्वत्र हिरवाई पसरलेली आम्हाला दिसेल

यावेळी बोलताना सुनंदा पेडणेकर म्हणाल्या की, आजपर्यंत या प्रभागात सातत्याने कुठलेही उपक्रम किंवा अन्य कार्यक्रम झाले नव्हते. ते अश्विनी पालयेकर यांच्या पुढाकाराने होत आहे,ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी वितरीत केलेल्या झाडांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: