गोवा 

‘विमान प्राधिकरणाने द्यावी शेतकऱ्यांची नुकसानभरपाई’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 15 मे रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे वारखंड नागझर, चांदेल हसापूर, उगवे मोपा आणि कासारवरणे या चार ग्रामपंचायत मधील शेतकऱ्यांना, त्यांच्या काजू बागायती, कुळागरे, तेथील पारंपरिक नाले, तळी अशांची हानी झाली याला पूर्ण जबाबदार  विमानतळ बांधण्यात येणाऱ्या कंपनीची आहे, ही नुकसान भरपाई सरकारने, कंपनी किव्हा विमानतळ प्राधिकरणने करावी, अन्नथा पुढील आठ दिवस वाट पाहणार व योग्य न्यायालयीन कारवाई केली जाईल असे स्पष्ट मत चांदेल हसपूरचे पंच तथा पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी पेडणे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वारखंड -नागझर, चांदेल- हसापूर, उगवे -मोपा आणि कासारवरणे या चार ग्रामपंचायत पंच, उपसरपंच व सरपंच मिळून पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणिकर यांनी नुकसान भरपाई चे निवेदन सादर केले उपजिल्हाधिकारी यांच्या बरोवर एक तास या संदर्भात चर्चा केली व नंतर पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांना बरोबर वारखंड -नागझर सरपंच संजय तुळसकर, पंच मंदार परब, चांदेल पंचायतीचे उपसरपंच शाम नाईक, शशिकांत महाले, निखिल महाले यावेळी उपस्थित होते.

तुळशीदास गावस :
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम घेतलेले जी एम आर कंपनी यांच्या हलगर्जीपणा मुळे आणि योग्य नियोजन नसल्यामुळे पंधरा तारखेला जे वादळ झाले त्यामुळे वारखंड -नागझर, चांदेल- हसापूर, उगवे -मोपा आणि कासारवरणे या पाच ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांची नुकसानी झाली, गावातील पारंपरिक पाण्याच्या वाटा, गावातील असलेल्या तळ्याची नाशाडी झाली, लोकांच्या घरात पाणी शिरले, काजी बागायती, कुळगरे नष्ट झाल्या या संदर्भात मोपा प्राधिकरण, व जी एम आर कंपनी यांच्या कडे लेखी स्वरूपात निवेदने दिली आहेत मात्र जी एम आर कंपनीने कानावर घेतले नाही याचा परिणाम म्हणून या चारही पंचायत क्षेत्रातील लोकांना कोट्याची हानी झाली आहे.

शशिकांत महाले :
काजी लागवड करणारे शेतकरी बाजूच्या बांदा गावात जाऊन काजू विकत घेणाऱ्या सावकाराकडून अगोदरच आर्थिक मदत आगाऊ आणतात या वर्षी शेतकऱ्यांना नुकसान झाल्या मुळे त्या शेतकऱ्या चे पुढे कसे होईल. मोपा विमानतळ कंपनी जी एम आर कंपनी यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन पाहणी करावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आहे.

 

वाहून आलेली माती

पंच -मंदार परब :
गावात असलेल्या पारंपरिक तळी, झरे, व्हाळ, विहिरी आज नष्ट झाल्या आहेत, पठारावरील लाल मातीचा थर विहिरीत, तळीत, शिरल्याने पाणी दूषित झाले.  गावची नैसर्गिक संपत्ती संपुष्टात आली आहे याला जबाबदार मोपा प्राधकारण जी एम आर कंपनी, चारही ग्रामपंचायतिने पुढील कारवाही करण्या अगोदर यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

उपजिल्हाधिकारी निपाणिकर यांनी शेकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पुढे काय? कशा प्रकारे उपाययोजना करणार, नुकसानी कशी भरून काढणार, येणाऱ्या पावसाळ्यात कश्या प्रकारे निओजन करणार या साठी एकत्रित निवेदन दिले आहे. उध्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, विमानतळ प्राधिकरण मंत्रालय याना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती तुळशीदास गावस यांनी दिली.

 उपजिल्हाधिकारी- रविशंकर निपाणिकर :
माणुसकीच्या दृष्टीने पारंपरिक निसर्ग सौंदर्य हानी करणे योग्य नव्हे, जी एम आर कंपनीला बोलावून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याची तरतूद करणार, न केल्यास त्यावर योग्य कारवाही केली जाईल, व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलस जाईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: