गोवा 

‘जगावर राज्य करण्याची पेडण्यातील युवकांची क्षमता’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मोपा विमानतळावर सर्व प्रकारच्या नोकऱ्या पेडणेतील युवकाना रोजगार देण्याची क्षमता आहे ,त्यासाठी आवश्यक्षक ते पूर्वप्रशिक्षण घेण्याची गरज आहे , युवकामधील कौशल्याचा विकास करण्यासाठी जिएमआर कंपनीने पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी युवकांची निवड केली आहे . हे प्रशिक्षण घेवून पेडणेचा युवक कुठेही जगाच्या पाठीवर जावून राज्य करू शकतो असे उद्गार उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे येथे युवा कौशल्य रोजगार भरती कार्यक्रमात काढले.

शुक्रवार १६ रोजी जीएमआर विमानतळ बांधकाम कंपनीने पेडणे सरकारी रेस्ट हाऊस येथे एकूण ७० युवकाना पूर्वप्रशिक्षण रोजगार भरती आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वितरीत केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई , नगरसेविका विशाखा गडेकर , हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर , तोरसे जिल्हा सदस्य सीमा खडपे ,धारगळ जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर वारखंड सरपंच संजय तुळसकर , विमानतळ कंपनीचे अधिकारी मिलिंद पैदरकर , पंच अब्दुल नाईक , उल्हास देसाई ,प्रकाश कांबळी , जगन्नाथ देसाई ,आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना पूर्व प्रशिक्षण घेतल्याने युवकांचे कौशल्याचे दर्शन होते. शिस्त मिळते . शिक्षण झाले म्हणून होत नाही कसे बोलावे कसे वागावे हे संस्कार म्हत्वाचे आहे . प्रशिक्षण घेणारे पेडणेकर राज्यात अग्रगण्य आहे असा विश्वास व्यक्त केला.

‘बाबूने कोणता विकास केला नाही ?’
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले आपण १९९९ साली आमदार झाला त्यावेळी मतदार संघ कसा होता याची जाणीव ज्यावेळी जो कोणी २५ वर्षाचा युवक होता त्याला माहिती असणार , आज काल निवडणुकीच्या तोंडावर काही स्वयंघोषित नेते मतदार संघात फिरतात आणि एका झोपडीला दोन पत्रे घालतात आणि घर बांधून दिल्याचे जाहीर करतात तर दुसरा कोणी एका ठिकाणी रस्त्या नसल्याचे सांगून त्या ठिकाणी मिनी पूल उभारला ते दाखवत नाही .त्या नेत्यावर विश्वास ठेवू नका , बाबू आजगावकर यांनी कोणता विकास केला नाही ते मतदारांना माहित आहे .

विकास १०० टक्के, विरोधक शोधतात :
मतदार संघात १०० टक्के विकास झाला आहे असा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी करून काही नेते जिथे विकास केला नाही ते शोधत आहे , त्याना काहीच सापडत नाही असा टोला मारला.

रोजगारासाठी प्रकल्प :
पेडणे तालुक्यात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारीची , त्यासाठी मतदार संघात मोठमोठे प्रकल्प खेचून आणले आहेत , त्या मोपा विमानतळ ,आयुष्य हॉस्पिटल , होवू घातलेला क्रिकेट स्टेडीयम  या प्रकल्पातून रोजगार मिळणार आहे , आणि ते मिळवून देण्यासाठी युवकांनी परत एकदा आपणास संधी द्यावी असे आवाहन आजगावकर यांनी केले.

मोपामुळे अडीच हजार रोजगार :
मोपा विमानतळामुळे अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहे आणि या सर्व नोकऱ्या पेडणेतील युवकाना मिळणार आहे .युवकाना संधी मिळण्यासाठी हि संधी आहे , त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यायला हवे असे मंत्री आजगावकर म्हणाले .

शिक्षण आणि प्रशिक्षण महत्वाचे ; रंगनाथ कलशावकर
हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी बोलताना युवकांच्या जीवनात शिक्षण महत्वाचे आहे त्याच तऱ्हेने त्या त्या कामाचे प्रशिक्षण महत्वाचे आहे . आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी युवकांनी पाठींबा द्यावा असे आवाहन केले .

युवकांच्या हातात देश ; तुळसीदास गावस
पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी बोलताना युवकांचा हातात सुरक्षित देशाचे भविष्य आहे , त्यासाठी युवकांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असायला हवे . विमानतळ प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगाराची संधी मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेणे महत्वाचे असल्याचे गावस यांनी सांगितले .युवकांची ताकत संघटीत करण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकार नवनवीन उपक्रम राबवत असतात , कौशल्याचा उपयोग राज्याला देशाला आणि जगाला व्हावा यासाठी कार्यरत होण्याचे आवाहन केले.

युवकांच्या योजना युवकांसाठी ; नगराध्यक्ष उषा नागवेकर
पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना सरकार विविध योजना राबवत असतात , मात्र आता युवकाना प्रशिक्षण देण्याची योजना राबवली जाते .विमानतळाच्या निमित्ताने प्रशिक्षण आता सुरु होणार आहे .आणि त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध  होणार असे उषा नागवेकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: