गोवा 

मोरजीत ९० वर्षीय आजीने घेतली कोरोना लस

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मोरजी पंचायत क्षेत्रातील टीका उत्सवात एकूण ५०६ नागरिकांनी लस घेतली , त्यात ९० वर्षीय मारिया परेरा यांचा समावेश आहे , यात तरुणांचा मोठा सहभाग होता .

केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे गावागावात १०० टक्के नागरिकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी टीका उत्सव आयोजित केला होता .

मोरजी येथील श्री कळस देव मांगर सभागृहात आयोजित केलेल्या कोरोना टीका उत्सवाची जनजागृती मोरजी पंचायत क्षेत्रातील एकूण ९ पंच सदस्य , सरपंच वैशाली शेटगावकर , उपसरपंच अमित शेटगावकर , पंच मुकेश गडेकर , विलास मोरजे , पवन मोरजे ,प्रकाश शिरोडकर , तुषार शेटगावकर , संपदा शेटगावकर , सुप्रिया पोके , मोरजी जिल्हापंचायत सदस्य सतीश शेटगावकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर , मंदार पोके, महिला मोर्चा भाजपाचा अध्यक्षा नयनी शेटगावकर आदींनी परिसरात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन केले होते .

टीका उत्सवात एकूण ५०६ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. मनस्वी आळवे, सदानंद शेटगावकर, कुशाजी नाईक, रंजिता शेटगावकर, प्राची कलशावकर या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बरीच मेहनत घेतली.

pernem

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: