गोवा 

पेडण्यातील प्रकल्प नेमके कोणासाठी?

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे नेहमी म्हणत असतात कि जे पेडणे तालुक्यात प्रकल्प आणले गेले ते प्रकल्प पेडणे तालुक्यातील नागरिकासाठी आहे .. पण जे प्रकल्प मतदारसंघात आणि पेडणे तालुक्यात चालू आहेत होवू घातलेले आहे ते प्रकल्प खरोखरच पेडणेकारासंसाठी उभारले जातात कि बाहेरचाना संधी देण्यासाठी असा प्रश्न आता पेडणेवासीयांच्या मनात घर करून राहिलेला आहे .

पेडणे तालुक्यात होवू घातलेला मोपा विमानतळ , तुये येथील आयटी प्रकल्प , धारगळ येथील आयुष हॉस्पिटल , नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , मोपा परिसरातील एरोसिटी हे प्रकल्प मार्गी लागणार आहे . या प्रकल्पातून नक्कीच स्थानिकांना रोजगार , विविध व्यवसाय मिळतील कि भलत्यानाच त्याचा लाभ होणार आहे , सध्या मोपा विमानतळ , आयुष हॉस्पिटल आणि तुये येथील ईलेक्टोनिक्स सिटी या प्रकल्पाचे काम सुरु आहे . प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी पेडणेकराना किती रोजगार आणि काम चालू असताना विविध प्रकारचा व्यवसाय किती मिळाला ,याची माहिती कुणालाच नाही .मग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर किती जणाना रोजगार आणि व्यवसाय मिळणार हा संशोधनाचा विषय आहे.

जर पेडणे तालुक्यातील जनतेसाठी हे प्रकल्प येत असतील तर दोन्ही लोकप्रतिनिधीने प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी किती जणाना रोजगार आणि यातून व्यवसाय मिळाला याची माहिती द्यायला हवी . प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांनाच रोजगार आणि विविध प्रकारचे व्यवसाय मिळतील याची ग्वाही कोण देणार , आताच प्रकल्पातील विविध कामे ट्रान्सपोर्ट ,बांधकामाचे लहान लहान ठेके हे बिगरगोमतकियाना दिले जातात आणि लोकप्रतिनिधी गप्प आहेत हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थानिकाना रोजगार आणि व्यवसाय मिळवून देण्याची ग्वाही कोणीही देवू शकत नाही , ज्या वेळी प्रकल्प पूर्ण होतील त्यावेळी कदाचित लोकप्रतीनिधी आणि सरकार शिवाय ठेकेदारही बदललेले असतील , मग पेडणेकरानी कुणाकडे भांडावे अशी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पेडणे तालुक्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी सरकार मांद्रे मतदार संघात तुये येथे इलेक्ट्रोनिक्स सिटी , मोपा येथील मोपा विमानतळ , आयुष हॉस्पिटल ,होऊ घातलेले रवींद्र भवन , तुये हॉस्पिटल हे बहुउद्देशीय प्रकल्प सरकार उभारत आहे , त्या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हजारो नोकऱ्या उपलब्ध होतील त्या नोकऱ्या नक्कीत पेडणे तालुक्यातील बेरोजगार युवकांना मिळतील याची ग्वाही कोण देणार, राज्यकर्ते आपल्या पद्धतीने मताकडे लक्ष देवून या नोकऱ्या पेडणेवासियानाच मिळणार असे छातीठोकपणे सांगत असतात .

mission for localबेरोजगारी हटवा : राजन कोरगावकर

पेडणे मतदार संघातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे , आजपर्यंत निवडून आलेल्या आमदाराने हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही किंवा बेरोजगारी हटवण्याच्या नजरेतून आजपर्यंत एकही प्रकल्प आणला नाही , सध्या विमानतळ आणि आयुष हॉस्पिटल हे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत , स्थानिक आमदाराने बेरोजगारी हटवण्यासाठी राज्य पातळीवरून कोणते प्रकल्प आणले असा सवाल कोरगाव येथील उद्योजक राजन कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे . सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळणार नाही मात्र तालुक्यात राज्य सरकार चांगले उद्योग व्यवसाय आणू शकतात त्यातून आठवी पास ते उच्चशिक्षित युवकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकता . तसा प्रयत्न आजपर्यंत निवडून आलेल्या राखीव मतदार संघातील लोकप्रतिनिधीने का प्रयत्न केले नाही असा सवाल राजन कोरगावकर यांनी उपस्थित केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: