गोवा 

​पेडण्यात दुचाकी चोरट्यास अटक

पेडणे :
हरमल येथी डिओ जी ये 03 ऐ जे 4322  दुचाकी वाहनाचा अपघात एक विदेशी महिला पर्यटक चालत असता त्याला हरमल बेकरीजवळ धडक दिली. अपघात होताच घटनास्थळी दुचाकी सोडून पळाला. हा  अपघात 9 रोजी घडला होता. त्या संदर्भात शिबु माणिक (रा. पश्चिम बंगाल)या युवकाला आज, 11 रोजी अटक केले.

 

त्यावेळी काही स्थानिक व्यक्तींनी स्कुटरस्वाराचा व्हिडिओ शूट केला होता. त्याच्या शरीरावर देखील जखम झाली होती आणि हाच व्हिडिओ पेडणे पोलिसांनी पाहिला होता. पुढे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. आणि या संबंधात जवळच्या आरोग्य केंद्रात लक्ष ठेवण्यात आले होते. आज संशयित व्यक्ती जिल्हा रूग्णालया म्हापसा गेला असता. पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळविले. नंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार केले.

 

9 रोजी अपघात झाला होता, त्या अपघातातील वाहन आपण शापोरा येथून केल्याची माहिती दिली.  संशयित  शिबु माणिक मंडळ, वय 31, राहणार हसनाबाद, घोष,  पश्चिम बंगाल सध्या फुटबॉल मैदान वागातोर अंजुना येथे वास्तव्य करत आहे. चौकशी दरम्यान आणखी बाईक सापडल्याची पोलिसांना आशा आहे.
पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल पी. गिरी, रूपेश कोरगावकर, फटी नाईक, महेश नाईक, जीवन गोवेकर आदींनी कारवाई केली. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: