गोवा 

‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर) :
पेडण्याला राखीव मतदारसंघ म्हणतात, पण जसा विकास व्हायला हवा होता, तसा अजून झालेला नाही. येथील आमदाराने फक्त आणि फक्त स्वतःचा विकास केला आहे. लोकांसाठी अजून त्यांनी काही केलेलं नाही, असा टोला मगोप नेते प्रवीण आर्लेकरांनी लगावलाय. पेडणे तालुक्यातील हणखणे गावच्या एका कुटुंबाला शिलाई मशीन प्रदान करताना ते बोलत होते.

आज आपण 21 व्या शतकात आहोत आणि पेडणे तालुक्यातील उपमुख्यमंत्री असूनही पेडण्यातच विकास झालेला नाही हे पाहून खूप वाईट वाटतं. जर आपण निवडून आलो तर ही परिस्थिती बदलेन. तसंच या मतदारसंघातील युवक हे बेरोजगार दिसणार नाहीत. त्यांना रोजगार देण्याच मी प्रयत्न करेन. मी पेडणेकरांबरोबर राहणार आणि त्यांचा विकास करणार, असं आर्लेकर म्हणाले.बेरोजगार कुटुंबाला दिलं शिलाई मशिन हणखणेतील एका कुटुंबाकडे उदरनिर्वाह करण्यासाठी काही काम नव्हतं. या कुटुंबातील निता गांवकरांनी व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीनची मागणी केली होती. काही दिवसातच आर्लेकरांनी गांवकर कुटुंबाला मशीन दिलं. मागणी पूर्ण केल्याबद्दल नीता गांवकर यांनी आर्लेकरांचे आभार मानले. ज्यांच्याकडे लोकांना मदत करायची दानत असते तेच लोकांची पुढे येऊन मदत करतात. प्रवीण आर्लेकर अशाच व्यक्तींमधील एक आहेत, असं गांवकर म्हणाल्या.

आज जिथे पेडणेचे आमदार घरी बसून आराम करतायत, तिथे आर्लेकर पेडणे तालुक्याची भ्रमंती करून लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत विविध माध्यमातून आर्लेकर पेडणेकरांची मदत करत आलेत. यातूनच पेडणेकरांविषयीची त्यांच्या मनातील तळमळ दिसून येते.

आज या मतदारसंघातून आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी स्वतःची भरभराट केली. लोकांच्या मतावर हे नेते देश-विदेश फिरले. पण पेडणेकरांचा विकास काही केला नाही. पेडणेतील जनता खुळी नाही. येणाऱ्या निवडणुकीत पेडणेकर विचार करून योग्य काय तो निर्णय घेतली, असं उगवेचे उपसरपंच सुबोध महाले म्हणाले.

या कार्यक्रमात प्रवीण आर्लेकर, सुबोध महाले, चंद्रशेकर खडपकर, अशोक धावस्कर, महेश परब, रमाकांत तुळसकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: