गोवा 

राष्ट्रीय महामार्गावर ‘त्या’ सगळ्या ठिकाणी दिशाफलक लावण्याचे आदेश

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसातही चालू असल्याने पत्रादेवी , पोरस्कडे , मालपे धारगळ येथील सर्विस रस्ते अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडून डबकी तयार झाली आहेत , या रस्त्याविषयी नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सरकारला आणि कंत्राटदाराला जाग आली नाही .याविषयी लेखी निवेदने दिली. माध्यमांत वारंवार वृत्त प्रसिद्ध केले तरीही सरकारचे धोरण गोगलगाय नि पोटात पाय अशी स्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर या भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आज अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पेडणे शासकीय विश्राम धाम येथे आयोजित केली होती , त्यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी कंत्राटदार व अभियत्याना सुचना करताना जिथे धोका निर्माण  झाला, पाणी साचून आहे, अशा सगळ्या ठिकाणी दिशाफलक लावण्याची सुचना केली.  यावेळी राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंते गुप्ता , कंत्राटदार श्रीनिवास वेणू , पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , चांदेल सरपंच संतोष मळीक , पंच समील भाटलेकर , प्रदीप कांबळी , प्रदीप पटेकर , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई आदी उपस्थित होते.

पुढच्या आठवड्यात मंत्र्यासाहित पाहणी या रस्त्याची धोकादायक स्थितीचा आढावा यावेळी मंत्री बाबू आजगावकर उपस्थित सरपंच नागरिकांनी कंत्राटदार अभियत्यासमोर वाचला , वारंवार सांगूनही जर कंत्राटदार ऐकत नसेल तर त्याना ताकीद द्यावी लागणार , मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासमोर या विषयी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले . पुढच्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांच्यासहित परत पाहणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले  .

राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेले सर्व्हिस रस्ते अत्यंत धोकादायक स्थिती आहेत  . या रस्त्यावर जर नजर मारली तर या रस्त्याला कोणी वालीच नसल्याचे दिसून येते . ठेकेदार आपल्याला हवे तसे काम करत आहे . धारगळ येथील उड्डाण पुलाला जवळील कॉंक्रीट खचलेले आहे , गटार व्यवस्था कोलमडलेली आहे , राष्ट्रीय महामार्गावरील काही माती थेट शेतात सर्विस रस्त्यावर येवून धोका निर्माण झाला आहे .

पत्रादेवी ते धारगळ म्हाखाजन कोलवाळ पूल पर्यंतचा राष्ट्रीय  महामार्ग अत्यंत धोकादायक स्थितीत असून , ज्या ठिकाणी काम चालू आहे तिथे कोणत्याच प्रकारचे फलक रात्रीच्या वेळी रेडीयम असलेले दिशाफलक स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे . त्याचा एक भाग म्हणून १३ रोजी मालपे रस्त्याचे काम सुरु आहे त्याठिकाणी एका ट्रकला अपघात झाला होता  , त्यातून त्याची बरीच नुकसानी झाली .

या रस्त्याचे काम जी एम आर कंपनीला मिळालेले आहे , स्वाभिमानी पेडणेकरांनी या ठेकेदाराच्या विरोधात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र  झोपेचे  सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली नाही , म्हणून स्वाभिमानी पेडणेकरानी थेट न्यायालयात धाव घेवून या ठेकेदाराविरोधात तक्रार नोंदवावी म्हणून याचिका दाखल केली आणि न्यायालयाने दाखल घेवून पेडणे पोलिसाना या ठेकेदाराविरोधात पहिला गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला .

एम व्ही आर ठेकेदाराची अजून मनमानी चालू आहे. रस्त्याचे काम करत असताना जी काळजी प्रवाशाना , वाहनधारकाना घ्यायची असते त्यासाठी रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याच उपाय योजना आखलेली नाही . त्यामुळे आजही या धोकादायक रस्त्यावर अपघात होतात , सरकारने निदान आता तरी या रस्त्याकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी या वेळी उपस्थित सरपंचानी  केली आहे.

pernem

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: