गोवा 

‘पर्यावरणाचा समतोल राखा; झाडे लावा, सुखाने जगा’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
निसर्ग आपल्याला भरभरून देतो , त्यांच्याकडे देण्याची दानत आहे , मनुष्य मात्र घेत असतो , निसर्ग आणि पर्यावरण यांची योग्य ती सांगड घालून त्याचा समतोल राखण्यासाठी निसर्गाची पूजा करून झाडे लावा,आणि जीवन सुखा समाधानाने जगा , असे आवाहन ध्रुव स्पोर्ट्स कल्बचे चेरमेन तथा गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांनी संस्थेतर्फे २०२१ वनमहोत्सव साजरा केल्यानंतर  कार्यक्रमात बोलताना केले .

 

११ रोजी पार्से व तुये येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेखर पार्सेकर , निलेश कलंगुटकर ,माजी सरपंच गोपाळ भिसाजी , सिदेश नाईक , अनिकेत केरकर, श्रीराम साळगावकर , राम नागवेकर , गंगाराम नाईक त्रिवेणी सावंत , उलीन्दा फर्रनांडीस ,सितारा मांद्रेकर ,विषया कांबळी ,अनिता कलंगुटकर ,साईली कांबळी ,अमिषा शेटगावकर,दिशा कांबळी ,गोकुळदास गवंडी ,धीरज हडफडकर ,राहुल बांदेकर आदी  उपस्थित होते.

दीपक कलंगुटकर  यांनी पुढे बोलताना जंगल तोड व किनारी भागातही झाडे तोडून कोन्क्रीट जंगले उभारली जातात , हे पर्यावरणाला घटक आहे , निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून आम्ही आपला परिसर हरित परिसर करुया ,झाडे आम्हाला प्राणवायू देतात आणि मानवाला जो कार्बनडाय ऑक्साईड  हानीकारक आहे ते झाडे शोषून घेतात त्यामुळे झाडांचे महत्व समजून प्रतेकानी झाडे लावावीत असे आवाहन केले .

 

दीपक यांनी पुढे बोलताना झाडावर जसे आपण आपल्या मुलावर संस्कार करीत असतो तसे संस्कार लावलेल्या झाडावर करून त्याला मायेचे खतपाणी घालून वाढवा मोठेपणी आपल्याला ती झाडे चवदार फळे देतील याचेही भान ठेवा एक झाड कापले तर त्याठिकाणी दोन झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयज्ञ करण्याचे आवाहन केले .

यंदा २७०० झाडे लावणार :
गतवर्षी ध्रुव क्लबने १५०० झाडे लावली होती याना ते २७०० झाडांची लागवड करणार आहेत. पूर्ण मांद्रे  मतदारसंघात जुलैच्या शेवट पर्यंत हि झाडे लावली जाणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: