गोवा 

खटला सुरु असतानाही रिसॉर्टने केले बांधकाम

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर) :

जुनसवाडा मांद्रे येथील श्री नारोबा देवस्थानच्या नजीक रिवा रिसोर्टच्या विस्तारित बेकायदेशीर बांधकामाची पाहणी पंचायत समितीने केली.याबाबत सरपंच सुभाष आसोलकर यांनी कडक कारवाईचा इशारा दिला असून खटला न्यायालयात असूनही रिसोर्टने बांधकाम चालविल्याने पंचायत मंडळ नाहक टीकेचे धनी होत असल्याने सरपंच आसोलकर यांनी नाराजी व्यक्त केली.

अलीकडच्या प्रत्येक ग्रामसभेत रिवा रिसोर्ट व बेकायदेशीर बांधकाम, असा टीकेचा व चर्चेचा विषय होत होता.ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार पाहणी समितीत सरपंच सुभाष आसोलकर,पंचसदस्या सेराफीना फेर्नांडिस, पंचायतीचे वकील ऍड प्रसाद शहापूरकर,दयानंद बांदेकर, सागर सावंत पंचायत सचिव अविनाश पाळणी यांचा समावेश होता.पंचायत समितीने कायदेशीररित्या रिसॉर्ट आवारात प्रवेश घेतला व त्यांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.पाहणीअंती बऱ्याच धक्कादायक गोष्टी लक्षात आल्या.समुद्र व खाडी एकदम नजीक असूनही नियम कायदे खुंटीला टांगण्यात आले व  राजरोसपणे बांधकामे करण्यात आल्याचे दिसून आले.सदर रिसॉर्टचा खटला पंचायत संचालनालय समोर चालू असून रिसोर्टने बेकायदेशीर बांधकामे चालूच ठेवल्याचे गंभीर बाब असून पंचायत कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई करेल असे सरपंच सुभाष आसोलकर यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार,रिवाची पाहणी करण्यास 15 जूनची तारीख निश्चित केली होती, परंतु रिसोर्टचे मालक सचिन नाईक यांनी विनंती अर्ज करून पाहणी पुढे ढकलावी अशी विनंती अर्जाद्वारे केली होती.त्यामुळे पंचायतीने 18 जूनला निश्चित केले असता,पुन्हा तसाच प्रयत्न मालक नाईक यांनी केला असता, सबळ कारण नसल्याचे सांगून आम्ही कायदेशीररित्या पाहणी केल्याचे सरपंच आसोलकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: