गोवा 

तळर्ण रस्ते उखडले, प्रशासनाचा पत्ताच नाही

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
गुरुवारी पहाटे पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्याना पूर येवून लाखो रुपयाची वैयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक स्थरावर लाखो रुपयांची नुकसानी झाली . विज खांब, रस्ते, मिनी पूल , घरे ,भात शेती बागायती यांची  मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली , पूर ओसरून चार दिवस झाले तरीही तळर्ण भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणीच फिरकले नाही.

या पुरामध्ये तळर्ण येथील अंतर्गत २० मीटर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे . या परिसरात एक मिनी पूल आहे त्या पुलाच्या खाली दोन पाईप घातलेले होते , त्यातून पाणी सरळ गेले नाही त्यामुळे परिसरातील पाणी पूर्णपणे रस्त्यावर आले, पाणी जात नसल्याने अधिक पूरग्रस्त स्थिती जाणवत होती . २० मीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे उखडून गेला.

तळर्ण भागात आज पर्यंत कोणतेच आमदार मंत्री किंवा आपत्कालीन सरकारी यंत्रणेने भेट देवून आमची साधी चौकशी केली नाही , असा दावा येथील नागरिकानी केला आहे.

रस्ता उखडून गेला त्यामुळे या रस्त्यावरून वाहने कशी चालवणार यांची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग पेडणेच्या अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी राजन कोरगावकर यांनी केली  .

येथील नागरिकांचे म्हणणे आहे ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी ते आजपर्यंत कुणीच  या भागाला भेट दिली नाही , केवळ मिशन फॉर लोकलचे नेते राजन कोरगावकर यांनी या भागाला भेट देवून निदान आमची विचारपूस केली , शिवाय कोणत्या मदतीची गरज आहे ते जाणून घेतले , मात्र आम्ही निवडून दिलेले आमदार मंत्री फिरकले नाही . ,मंत्री बाबू आजगावकर आजगावकर शुक्रवारी आले ते कुठे आले हे आम्ही ज्या दुसऱ्यादिवशी वर्तमान पत्रे वाचली तेव्हा कळले . आमदार मंत्र्याने आमच्याकडे का पाठ फिरवली असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: