देश-विदेश

जातीभेदाला त्रासून धर्मांतरण करणारे सर्वाधिक

नवी दिल्ली :
भारतामध्ये धर्मांतरणाच्या विषयावरुन अनेकदा राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच एका सर्वेक्षणामधून हिंदू धर्मियांमधील धर्मांतरणासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वोक्षणामध्ये भारतात सर्वाधिक धर्मांतर हे हिंदू धर्मामधून इतर धर्मांमध्ये होत आहे. विशेष बाब म्हणजे हिंदू धर्मातून होणाऱ्या या धर्मांतरणांच्या कारणाबद्दल बोलताना धर्मांतर करणाऱ्यांपैकी अनेकांनी जातीभेदाला त्रासल्याने आपण धर्मांतर करत असल्याचं म्हटलं आहे. खास करुन अनुसूचित जातीमधील म्हणजेच एससी आणि ओबीसीमधील अनेकांनी धर्मांतरणासाठी जातीभेदाचं कारण दिलं आहे.

प्यू रिसर्च सेंटरने (Pew Research Center) केलेल्या सर्वेक्षणातून धर्मांतर होत असले तरी धर्मांतराचा सर्वाधिक फायदा हा ख्रिश्चन समाजाला मिळत आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ०.४ टक्के लोक आधी हिंदू होते. तर ख्रिश्चन धर्मामधून धर्मांतर करणाऱ्यांचं प्रमाण केवळ ०.१ टक्का इतकं आहे. या सर्वेक्षणामध्ये धर्मांतर करणाऱ्यांमधील ५० टक्के लोक हे अनुसूचित जातींमधील आहेत. सर्वेक्षणानुसार ज्या हिंदूंनी आपला धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक जण हे अनुसूचित जातीमधील आहेत. तर १४ टक्के धर्मांतरित लोक हे अनुसूचित जमातीमधील आहेत. त्याचप्रमाणे धर्मांतर करणाऱ्यांपैकी २६ टक्के लोक हे ओबीसी आहेत.  हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांपैकी ४५ टक्के लोकांनी भारतात प्रामुख्याने अनुसूचित जातींमधील व्यक्तींसोबत भेदभाव केला जात असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जातीपातीचा भेदभाव हेच धर्मांतरण करण्याचं प्रमुख कारण असल्याचं ४५ टक्के लोकांनी म्हटलं आहे.

 

प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, भारतात ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करणाऱ्यांपैकी ७४ टक्के लोक हे दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्येत थोडी वाढ होण्यामागे हे धर्मांतर कारणीभूत असल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी सहा टक्के दक्षिण भारतीयांनी आपण जन्मापासून ख्रिश्चन असल्याचं सांगितलं. तर सात टक्के लोकांनी आपण सध्या ख्रिश्चन असल्याचं म्हटलं आहे.

pew

प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, धर्मांतरामुळे कोणत्याही धर्मातील समाजाच्या लोकसंख्येवर विशेष परिणाम झालेला नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास, सर्वेक्षणात सहभागी ८१.६ टक्के लोकांनी आपला जन्म हिंदू धर्मात झाल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे ८१.७ टक्के लोकांना आपण सध्याच्या घडीला हिंदू असल्याचं सांगितलं आहे.

याचप्रमाणे ११.२ टक्के लोकांनी आपला जन्म मुस्लीम धर्मात झाल्याचं सांगितलं असून तितक्याच लोकांना आपण सध्या मुस्लीम असल्याचं सांगितलं आहे. तसेच २.३ टक्के लोकांनी आपला जन्म ख्रिश्चन धर्मात झाला होता सांगितलं असून २.६ टक्के लोकांनी आपण सध्याच्या घडीला ख्रिश्चन असल्याची माहिती दिली आहे.

प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वेक्षणा नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान म्हणजेच करोनाच्या थोड्या महिन्यांआधी करण्यात आलं होता. या सर्वेक्षणात देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ३० हजार ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. १७ भाषांमधील या नागरिकांसोबत समोरासमोर चर्चा करण्यात आली. त्याच्यात आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: