मुंबई 

‘पीएम केअरच्या व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी…’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रसरकारवर हल्ला चढवला आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाले असल्याचे समजते आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत उत्तर देण्यास सांगितले असल्याचीही बातमी आहे. यावरून मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाल्याची बातमी ऐकली. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागचा सुत्रधार कोण ? कोण गैरफायदा घेत आहे ? याचा छडा लागायला हवा असेही जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: