कला-साहित्यगोवा 

ज्येष्ठ कोंकणी कवी प्रकाश पाडगावकर यांचे निधन 

पणजी :
ज्येष्ठ कोंकणी कवी प्रकाश पाडगावकर (७२) (prakash padgaonkar)  यांचे आज कोविडमुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोविड बाधा झाल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना असताना शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
प्रकाश पाडगांवकर यांच्या ‘हांव मनीस अश्वतामो’ या काव्यसंग्रहाला १९८६ साली केंद्रीय साहित्य अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. कोंकणी साहित्यामध्ये त्यांच्या कवितेचे महत्वाचे स्थान असून, त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त होत आहे.  मूळ पणजीमधील पण सध्या पर्वरी येथे वास्तव्य करून असणारे पाडगावकर यांच्यामागे पत्नी संजीवी, पुत्र चैतन्य आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. त्यांची पत्नी आणि पुत्रही कोविड बाधित असून त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
prakash padgaonkar prakash padgaonkar
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!