सातारा 

कराड शहरात पोलिसांची धडक मोहीम

कराड (अभयकुमार देशमुख)
सातारा जिल्ह्यात कडक लॉकडॉउन सुरु आहे. ८ जून पर्यंत अत्यावश्यक सेवामधील हॉस्पीटल, मेडिकल आणि कृषीचे दुकाने सुरु ठेवण्याची फक्त मुभा आहे. मात्र कराड शहर आणि परिसरामध्ये छुप्या पध्दतीने काही व्यापा- यांनी विक्री सुरु ठेवलेली होती. या सर्वांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

कराड बाजार समितीच्या परिसरात अनेक दुकाने सील करण्यात आली. तर विनाकारण फिरणा- यांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या. ही कारवाई डी. वाय. एस. पी. रणजित पाटील आणि कराडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर पाटील यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली.

यावेळी बोलताना बी. आर. पाटील यांनी जिल्हाधिका-यांच्या नियमांचे उल्लघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तर नागरीकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंतीही केली.

या कारवाईत ए. पी. आय. गोडसे, पी.एस.आय. भरत पाटील तसेच पोलिस कर्मचारी, नगरपरिषेचे कर्मचारी सहभागी होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: