google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

परवाना नाही तर संगीत नाही : न्यायालय

मुंबई :

डिसेंबर 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने, परवाना नसताना फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (PPL MUSIC) च्या कॉपीराइट-संरक्षित ध्वनी रेकॉर्डिंगचा वापर करण्यापासून वैयक्तिक आस्थापनांविरुद्धएक प्रतिबंधात्मक आदेशांची मालिका जारी केली ज्यात विविध लोकप्रिय व्यावसायिक आस्थापने जसे की हॉटेल्स, रिसॉर्टस, लाऊनजेस, पब्स, क्लबस व बार जसे की झेको (Xeco) मीडिया एल एल पी (डिस्कव्हर रिसॉर्टस), डिजी1 इलेक्ट्रॉनिक्स, द बार स्टॉक एक्स्चेंज, स्नो वर्ल्ड एंटरटेंमेंट, अडयार (Adyar) गेट हॉटेल्स, बाइक (byke) हॉस्पिटलिटी, सिद्धिविनायक हॉस्पिटलिटी, एफएमएल (FML) हॉस्पिटलिटी, साई सिल्कस् (कलामंदिर), अंबुजा नेवतीया होल्डिंग्स, जीआरटी हॉटेल्स अँड रेसॉर्टस् आणि त्यांचे देशभरातील आऊटलेट्स समाविष्ट होते.


अलीकडील न्यायालयाच्या आदेशांना खूप महत्त्व आहे, कारण हा आदेश वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, ख्रिसमस आणि इतर कोणत्याही कार्यक्रमात पार्श्वभूमीवर वाजवल्या जाणार्‍या संगीतासह सर्व संगीताच्या वापरांना लागू होतो.


पीपीएल इंडिया (PPL music) ही एक ऐंशी वर्षांची, संगीत परवाना देणारी कंपनी आहे ज्यांचेकडे हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तमिळ, तेलगू यांसारख्या अनेक भाषांमध्ये 4 दशलक्षाहून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ध्वनी रेकॉर्डिंग नियंत्रित करणाऱ्या 350 हून अधिकहिन्दी, इंग्लिश, पंजाबी, तमिळ, तेलगू, कन्नड, हरियाणवी व भोजपुरी भाषेतील संगीत लेबल्सच्या ग्राउंड परफॉर्मन्स अधिकारांवर नियंत्रण/मालकी आहे.त्यांचेकडे काही मोठ्या रेकॉर्ड लेबल्स जसे की आदित्य म्युझिक, आनंदा ऑडिओ, दिवो, दिलजित दोसांझ, लहरी म्युझिक, सारेगामा, सोनी म्युझिक, सोनोटेक, टी-सिरीज, टाइम्स म्युझिक, यूनिवर्सल म्युझिक, वॉर्नर म्युझिक आणि तत्सम बऱ्याचश्या रेकॉर्डेड गाण्यांचा ऑन द ग्राउंड वापराच्या हक्काचे नियंत्रण आहे.


व्यावसायिक आस्थापनांना दोन प्रकारचे परवाने मिळणे आवश्यक आहे. एक कॉपीराइट केलेली गाणी त्यांच्या आस्थापनेत पार्श्वभूमीत वर्षभर वाजवण्यासाठी आणि दुसरे नवीन वर्ष, ख्रिसमस, व्हॅलेंटाईन डे, होळी किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स इत्यादी कार्यक्रमांसाठी जे लोकांना संगीताचा वैशिष्ट्यीकृत वापर साजरा करण्यास मदत करतात.



याबद्दल पी पी एल इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जी. बी. आयिर म्हणाले की, “जगभरात संगीत कॉपीराइट खूप महाग आहेत कारण संगीत कंपन्यांनी संगीत बनवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी अनेक अब्ज आणि ट्रिलियन्सची गुंतवणूक केली आहे.पी पी एल (PPL) द्वारे संगीत वापरणाऱ्या आस्थापनांकडून अपेक्षित परवाना शुल्क अतिशय नाममात्र आहे आणि ते तर्कसंगत/प्रकाशित दरांवर आधारित आहे.जरी भारतात, संगीत प्रत्येक प्रसंगी एक आवश्यक भूमिका बजावत असले तरी, अनेक लोक त्याच्या वापरासाठी पैसे न देण्याची मानसिकता बाळगतात ज्यामुळे केवळ योग्य हक्क धारकांचेच नव्हे तर संपूर्ण सर्जनशील समुदायाचे मोठे नुकसान होते.पी पी एल (PPL) सर्व आस्थापनांचे मनापासून आभार मानते ज्यांनी आगाऊ परवाने मिळवले आहेत, परंतु हटवादी उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध न्यायालयांकडून दिलासा मिळवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.काही गैर-अनुपालन करणाऱ्या वापरकर्त्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांबद्दल ऐकल्यानंतर, इतर अनेक आस्थापनांनी स्वेच्छेने पुढे येऊन पी पी एल (PPL) कडून परवाने घेतले आहेत.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!