सातारा 

प्रतापराव भोसलेंचे कुटूंबिय पोहोचले कोंडावळ्यात

सातारा (महेश पवार) :
भुईंजचे माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचे कुटुंबिय कौटुंबिक साहित्य व गरजेच्या वस्तू घेऊन कोंडावळ्यात पोहोचले आहेत. यावेळी युवा नेते यशराज भोसले आणि डॉ. सुरभी भोसले चव्हाण उपस्थित होत्या. डॉ ​सुरभी भोसले चव्हाण यांनी ​यावेळी महिला व ​मुलींसोबत संवाद साधला. ​

राज्याचे माजी मंत्री तथा जेष्ठ नेते प्रतापराव भोसले यांची तिसरी पिढी तोच वारसा व तीच बांधिलकी जपत सार्वजनिक जीवनात पहायला मिळते​. वाई तालुक्याच्या पश्चिम भागांत जोर खोऱ्यात कोंडावळे देवरुखवाडीतील ​दुर्घटनेत मायलेकरांचा अंत​ झाला असून. याठिकाणी पडलेल्या दरडीत मातीआड गेलेली घरे,​ उध्वस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे​. 

​अशावेळी शनिवारी दुपारी राज्याचे माजी मंत्री,​ ​माजी खासदार व जेष्ट नेते प्रतापराव भोसले यांचे कुटुंबिय थे​ट ​कोंडावळ्यात देऊखवाडीत पोहोचले व त्यांनी संसारपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले यावेळी जेष्ठ नेते व माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचे नातू युवा नेते यशराज भोसले व नात डॉ सुर​भी भोसले, गजानन भोसले, ऋतुराज चव्हाण,हे उपस्थित होते​. यावेळी त्यांचे सोबत भाजपा नेते सचिन घाटगे,​ ​यशवंतराव लेले,​ ​सागरभाई जाधव,​ ​तेजसदादा जमदाडे ,जितेंद्र वारागडे,हेमंत बाबर उपस्थित होते​. 
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: